ताज्या घडामोडी

सातारा:-भूमापकांच्या वेतन समतेसाठी साताऱ्यात भूमी अभिलेखा कार्यालयासमोर आंदोलन…

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

भूमापकांच्या वेतन समतेसाठी साताऱ्यात भूमी अभिलेखा कार्यालयासमोर आंदोलन…

सातारा दि: सर्वसामान्य शेतकरी व उद्योजक तसेच विकासक यांच्या नियमित कामांसाठी जमिनीची मोजणी करणे अत्यावश्यक आहे. आता भूमी अभिलेखा कार्यालयातील भूमापकांचेच आंदोलन सुरू असल्यामुळे सातारा जिल्ह्यातील तीन ते चार हजार मोजणी प्रलंबित राहिली आहे. या आंदोलनाचा फटका आता राज्य शासनालाही बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भूमापकाच्या वेतन श्रेणीमध्ये समता यावी. यासाठी हे आंदोलन होत आहे. त्याला वाढता पाठींबा मिळू लागलेला आहे.
महाराष्ट्रात ग्रामीण व शहरी भागामध्ये शेतकऱ्यांपेक्षाही इमारत व झाडे झुडपे आणि जंगलाची काळजी घेणाऱ्या त्या विभागातील भूमापकाचे वेतन जास्त आहे. हा त्यांचा अधिकाऱ्याचा आहे. तसाच अधिकार भूमि अभिलेखाच्या भूमापकांना मिळावा. याबाबत आता महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेने आंदोलन सुरू आहे .
याबाबत आंदोलकांनी माहिती दिली की, महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेखा विभागातील कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगातील सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याची राज्य शासनाने मान्यता द्यावी. यासाठी २०१९ साली माननीय न्यायाधीकारणाकडून राज्य सरकारला येत्या चार आठवड्यात त्याबाबत आदेश पारित करावे व त्याची अंमलबजावणी करावी. असे फिर निर्देश ची दिनांक ३० जानेवारी २०२५ रोजी देण्यात आले आहे. याबाबत अद्यापही निर्णय न घेतल्याने सातारा जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयासमोर संघटनेचे महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेखा कर्मचारी संघटना यांच्या वतीने आंदोलन सुरू आहे. भर पावसातही भूमापक कर्मचारी वर्ग आंदोलन करण्यासाठी ठाम आहेत.
या आंदोलनाला सेवानिवृत्त महसूल अधिकारी मच्छिंद्रनाथ जाधव, पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्य उपाध्यक्ष रमेश अनिल उबाळे व सामाजिक कार्यकर्ते तसेच रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश तथा सोन्या साबळे, भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष अरुण पवार व गुलाबराव बनसोडे यांनीही पाठिंबा दिलेला आहे.
सातारा जिल्ह्यातील भूमी अभिलेखा कार्यालयाच्यासमोर भर पावसात संघटनेचे राज्य अध्यक्ष विजय पिसाळ यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष राहुल भोसले, विनायक जाधव, रवींद्र फडके, राजेंद्र जगताप, उदयसिंह गायकवाड, प्रज्ञावंत कांबळे, सुनील मस्के, श्रीमती मुल्ला, एस एस बांदल, आनंद लगदिवे, कविता भिंताडे, राघू माने व रवींद्र तारळेकर आदी मान्यवर आंदोलनात सक्रिय सहभागी झालेले आहेत.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसाच्या उपक्रमांमध्ये आदेश दिल्यानंतर भूमी अभिलेख खात्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ४० हजार मोजणी प्रकरण निकाली काढले आहेत. शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे. याबाबत महाराष्ट्र दिनी माननीय जमाबंदी आयुक्त भूमी अभिलेखा यांना द्वितीय क्रमांक देऊन गौरव केला आहे. आता भूमापक कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये समता आणण्यासाठी इतर भूमापक पदाला जसा न्याय दिला जातो. तशा पद्धतीने भूमी अभिलेखा भूमापकांनाही वेतनामध्ये न्याय द्यावा. सध्या मोठ्या प्रमाणात भूमापक रिक्त पद भूमी अभिलेखा कार्यालयात असून सुद्धा कर्मचारी मिळेल त्या वेतनामध्ये ज्यादा काम करत आहेत. आणि हे वेतन सुद्धा इतरांपेक्षा कमी आहे. ही बाब आंदोलनामुळे निर्देशनास आली आहे. त्यामुळे जनतेतून मोठा
उठाव होण्यापूर्वीच राज्य शासनाने ठोस भूमिका घ्यावी. अशी मागणी करण्यात आलेली आहे .

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

_____________________________
फोटो सातारा भूमी अभिलेखा कार्यालयात वेतनासाठी आंदोलन करणारे भूमापक (छाया– निनाद जगताप, सातारा)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button