सातारा:-डॉक्टर सौ. निलम नलगे यांना राज्यस्तरीय अनेस्थेशिओलॉजिस्ट पुरस्कार.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
डॉक्टर सौ. निलम नलगे यांना राज्यस्तरीय अनेस्थेशिओलॉजिस्ट पुरस्कार.
सातारा दि: सातारा तालुक्यातील आरळे गावची सुपुत्री व माजी आमदार स्वर्गीय डी बी कदम यांच्या कन्या डॉ. सौ. निलम गजानन नलगे यांना राज्यस्तरीय अनेस्थेशिओलॉजिस्ट पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. निलम नलगे या उत्कृष्ठ धावपटू असून त्यांनी अनेक मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्याचा मान मिळविला आहे. लहानपणापासून त्या अभ्यासात हुशार होत्या. तसेच त्यांना बॅडमिंटन खेळण्याची आवड होती. सातारा शहरातील नामांकित अशा सेंट पॉल स्कूल मध्ये इंग्रजी भाषेत प्राथमिक शिक्षण घेऊन कराड येथील कृष्णा मेडिकल कॉलेज या ठिकाणी एम बी बी एस शिक्षण पूर्ण केले. पुढे मुंबई शहरातील प्रख्यात नायर हॉस्पिटलमध्ये त्यांनी अनेस्थेशिओलॉजिस्ट (भूलतज्ञ) शिक्षण पूर्ण केले. त्यांना सामाजिक कार्यामध्येही कार्यामध्ये खूप मोठी आवड असल्यामुळे त्यांच्या हातून अनेक रुग्णांना दिलासा मिळाला आहे. आदित्य आरोग्यमंगलम ह्यl त्याच्या ट्रस्ट तर्फे खुप गरीब रुग्णांना मोफत सेवा मिळते.एखाद्या मोठ्या व छोट्या शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णांना भूल देण्याचे महत्त्वपूर्ण काम हे भूलतज्ञ करावे लागते. डॉक्टर सौ निलम गजानन नलगे यांनी आतापर्यंत हजारो रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया होण्यासाठी प्रामाणिकपणाने सेवा केलेली आहे. माजी आमदार डी. बी. कदम व आई श्रीमती शशिकला कदम यांच्या आशीर्वादामुळेच तसेच मान्यवरांच्या मार्गदर्शनाने त्यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये गरुड झेप मारलेली आहे. सातारा जिल्ह्यातील यशस्वी उद्योजक अरविंद कदम यांच्या त्या थोरल्या भगिनी आहेत. ग्रामीण भागातून आलेल्या डॉक्टर सौ. नलगे यांनी इंग्रजी भाषेतूनच आपले प्राथमिक व माध्यमिक तसेच वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून ग्रामीण भागातील मुलींसाठी एक चांगले विचार दिलेले आहेत. तसेच सामाजिक कार्यातही त्यांनी मुंबई येथील बोरिवली परिसरात आपल्या नावाचा एक वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांचे अनेक मान्यवरांनी अभिनंदन केलेले आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये सामाजिक कार्य करण्याचा त्यांचा मानस असून त्यांच्या हातून सामाजिक व विधायक कार्य घडणार आहे. स्वर्गीय माजी आमदार डी. बी. कदम यांच्या कन्या म्हणून त्यांच्या कार्याला वेगळा ठसा उमटविला जाणार आहे.त्यामुळे अनेक मान्यवरांनी डॉ निलम गजानन नलगे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
————————&———————-
फोटो -डॉक्टर नीलम नलगे यांना राज्यस्तरीय
अनेस्थेशिओलॉजिस्ट पुरस्कार प्रदान करताना मान्यवर (छाया – निनाद न्यूज,)