राजाचे कुर्लेत सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवीन शाखेचे उद्घाटन संपन्न…
पत्रकार प्रमोद देवाडीगाव महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार प्रमोद देवाडीगाव महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष
राजाचे कुर्लेत सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवीन शाखेचे उद्घाटन संपन्न…
पुसेसावळी : बँकेचा आजवरच्या कार्यकाळामध्ये जिल्ह्याच्या विकासात सिंहाचा वाटा उचलून, बँकेची बचत ग्रामीण भागातील जनतेच्या विकासासाठी वापरण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले असून, जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. बँकेने सर्वसामान्य ग्राहकांना केंद्रबिंदू मानून केलेले कार्य केले आहे, राज्य व देशपातळीवर उत्कृष्ट कामकाजा बाबत अनेक पुरस्कार बँकेस मिळाले आहेत, बँकेने ठेवीदार- कर्जदार- ग्राहक, सभासदांचे हित जोपासले आहे, तरी आजपासून सुरू होत असलेल्या या नवीन शाखेच्या माध्यमातून ग्राहकांना बँकेकडून उत्कृष्ट सेवा पुरवली जाईल, असा विश्वास आमदार बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी माजी आमदार प्रभाकर घार्गे, बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, प्रदीप विधाते, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र सरकाळे,चंद्रकांत पाटील, जितेंद्र पवार, सी.एम.पाटील,
हरिदास सावंत, संतोष घार्गे, सुरेश पाटील,आदिची प्रमुख उपस्थिती होती,
तदनंतर माजी आमदार प्रभाकर घार्गे, बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, आदिची भाषणे झाली,
यावेळी सौ.सुनीता मगर, मानसिंग माळवे, दत्तात्रय रुद्रुके, उपसरपंच श्रीमती सुजाता शेडगे, सोसायटीचे चेअरमन आशुतोष माने, श्रीरंग माने(शेठ), अनिल माने, समरजीत राजे भोसले, पै.बापूसो माने, रावसाहेब माने, शहाजीराव माने, व्ही.आर.माने, छन्नूसिंग पाटील, सयाजी माने, संग्राम माने, आबा माने, जितेंद्र माने, तुकाराम माने, बाळासो देशमुख, डी.के.माने, अशोक माने, लक्ष्मण जगदाळे, सुनील माने, सुनील थोरवे, व ग्रामस्थ उपस्थित होते.