क्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

फलटण:-गणेश तांबे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.

पत्रकार प्रमोद देवाडीगा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पत्रकार प्रमोद देवाडीगा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

गणेश तांबे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.

फलटण तालुका शिक्षक समितीचे विद्यमान अध्यक्ष ,आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकर या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवणारे आदर्श उपक्रमशील शिक्षक श्री.गणेश तांबे सर यांचा वाढदिवस 3 एप्रिल रोजी उत्साहात संपन्न झाला.

दरवर्षी प्रमाणे नेहमी वाढदिवसानिमित्त आपल्या शाळेतील तसेच अंगणवाडीतील सर्व विद्यार्थ्यांना उन्हाच्या तीव्रतेचा उपाय म्हणून उन्हाळी टोपी वाटप, स्नेहभोजन, वेगवेगळ्या गोष्टीच्या पुस्तकांचे वाटप इ. उपक्रमाचे आयोजन ते दरवर्षी करतात. या वेळेस बिबी केंद्राचे केंद्रप्रमुख हिम्मत जगताप साहेब, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल कारंडे, सेवानिवृत्त शिक्षक चंद्रकांत सुतार, आदर्श शिक्षक कवितके सर उपस्थित होते

गुणवत्ता हीच मालमत्ता समजून ज्ञानदायाचे कार्य करत मातृत्वाचा जिव्हाळा जोपासत आई प्रतिष्ठानची स्थापना केली.समाजात उत्तमोत्तम कार्य करणाऱ्या व्यक्तिंच्या कार्याचा गौरव करुन त्यांना प्रेरणा आणि आत्मसन्मान देणारे, संवेदनशील व्यक्तिमत्त्व, वाचन लेखन चळवळीचा वारकरी, मातृत्वाचे संस्कारपीठ “पाझर मातृत्वाचा ”पुस्तकाचे लेखन करुन समाजापुढे एक आदर्श निर्माण करणारे सिंधूसुत ,दातृत्वाचा हात देवून सामाजिक बांधिलकी जोपासणारे सहृदयी गुरुजी असं बहुआयामी व्यक्तिमत्त्व.

वाचन चळवळ वाढवण्यासाठी त्यांनी 3000 अधिक पुस्तके आत्ता पर्यंत भेट स्वरुपात दिली.आहेत.तसेच विविध क्षेत्रातील सुमारे 190 गुणवंतांना त्यांनी आई प्रतिष्ठान मार्फत पुरस्कार देवून सन्मानित केले आहे.मराठी साहित्य प्रत्येक विद्यार्थी आणि शिक्षकापर्यंत पोहोचवणारे अभिजात वाचक , प्रामाणिक काम करणाऱ्या प्रत्येक शिक्षकाच्या पाठीवर हात ठेवून लढ म्हणणारे रत्नपारखी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शिवरायांच्या मातृभक्तीचा वारसा चालवणारे,
शांत ,संयमी, अत्यंत हुशार, मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व ,सामाजिक बांधिलकी जपणारे,सर्वांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे,
एक अभ्यासू होतकरू व्यक्तिमत्त्व ,
लेखक, कवी, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे.

आज वाढदिवसा निमित्त त्यांना सामाजिक,राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी फोन द्वारे व प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या आहेत. अशा या आगळ्या – वेगळ्या व्यक्तिमत्वाला उदंड आयुष्य लाभो.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button