कराड :-संजय नगर शेरे स्टेशन ग्रामसेवकाच्या चौकशीसाठी ग्रामस्थांचे निवेदन.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
संजय नगर शेरे स्टेशन ग्रामसेवकाच्या चौकशीसाठी ग्रामस्थांचे निवेदन.
कराड दि,: ग्रामपंचायतीच्या कारभारामध्ये गतिमानता येण्यासाठी सचिव म्हणून ग्रामसेवक हे सक्षम रित्या काम करत असतात. परंतु ,सध्या सातारा जिल्ह्यात ग्रामपंचायत जादा व ग्रामसेवक कमी. त्यामुळे अनेक ग्रामसेवकांना दोन ते तीन ग्रामपंचायतीचा कारभार पहावा लागतो. कराड तालुक्यातील संजय नगर शेरे टेशन स्टेशन येथील ग्रामसेवक यांच्याकडे मंगळवार हा वार असला तरी ते वेळेत उपस्थित राहत नाही. अशी तक्रार ग्रामसेवकांविरोधात केलेली आहे .
याबाबत ग्रामस्थ अजित जाधव रा. संजय नगर शेरे स्टेशन तालुका कराड यांनी सातारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेले आहे. ग्रामसेवक रवींद्र कोळी हे मंगळवारी गावात फक्त एक तास येतात. या कालावधीमध्ये ग्रामस्थांना आवश्यक असणारे कागदपत्रे तसेच शैक्षणिक व नोकरी व्यवसाय आणि कर्ज प्रकरणी लागणारे दाखले देण्यासाठी शासकीय नियमापेक्षाही जास्त पैसे घेतात. त्यांच्या मनमानी कारभारामुळे चौदावा व पंधरावा वित्त आयोगाचा निधी कशा पद्धतीने खर्च केला ? याची माहिती दिली जात नाही .
सदर ग्रामसेवक हे शासकीय कामकाजाच्या कार्यक्षमतेपेक्षा जमीन खरेदी विक्रीचे व्यवहारांमध्ये जास्त इंटरेस्ट दाखवतात. वास्तविक पाहता ग्रामपंचायत कार्यालय हे ग्रामपंचायतच्या नागरी सुविधा देणे बाबत कामकाज करणारी शासकीय इमारत आहे. पण बऱ्याच वेळेला जमीन खरेदीशी संबंधित व्यक्ती या कार्यालयात ग्रामसेवकांसोबत एका तासाच्या कालावधीत किमान वीस मिनिटे तरी चर्चा करत असतात. त्यांच्याकडे इतर गावाचाही पदभार आहे .त्या ठिकाणी अशा तक्रारी येत असल्याची माहिती काही ग्रामस्थांनी तोंडी दिलेली आहे. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात आज अनिल जाधव यांनी नायब तहसीलदार यांना निवेदन दिलेले आहे. तसेच आ शशिकांत शिंदे यांची भेट घेतली.या निवेदनामध्ये ग्रामसेवक कोळी यांची स्थावर मालमत्ता व इतर व्यवहाराची चौकशी करावी. त्यामध्ये ते दोषी आढळल्यास त्यांच्यावरती कडक कारवाई करावी. अशी मागणीही शेतकरी संघटनेचे धन्यकुमार जाधव व इतर केली आहे. सदर निवेदनाच्या प्रती अनेक वरिष्ठ प्रशासकीय यंत्रणेला पाठवलेली आहे. दरम्यान, याबाबत ग्रामसेवक व संबंधितांशी संपर्क होऊ शकलेला नाही. त्यामुळे त्यांची बाजू मांडता आली नाही.
——————————————
फोटो कॅप्शन सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रामसेवक यांच्या विरोधात निवेदन देताना ग्रामस्थ अनिल जाधव व शेतकरी संघटनेचे धन्यकुमार जाधव