खटाव तालुक्याप्रमाणे सर्वच शाळांनी शैक्षणिक साहित्य पेट्यांचा प्रभावी वापर करावा…. उपसंचालक महेश चोथे.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष
खटाव तालुक्याप्रमाणे सर्वच शाळांनी शैक्षणिक साहित्य पेट्यांचा प्रभावी वापर करावा…. उपसंचालक महेश चोथे.
खटाव (सातारा)
कृतीयुक्त शिक्षण आणि शैक्षणिक साहित्याचा वापर करून प्रत्येक घटकाची समज विद्यार्थ्यांना सहजतेने होते. शिकवलेले घटक विद्यार्थ्यांच्या दीर्घकाळ स्मरणात राहतात. यासाठी शासनाकडून शाळांना विषयनिहाय साहित्य पेट्या पुरविण्यात आलेल्या आहेत. अध्ययन – अध्यापन आनंददायी व्हावे व प्रत्येक मूल प्रगत व्हावे यासाठी सर्व शाळांनी शैक्षणिक साहित्य पेट्यांचा वापर सहेतुक करायलाच हवा. असे आवाहन कोल्हापूर विभागाचे शिक्षण उपसंचालक श्री. महेश चोथे यांनी केले. जिल्हा परिषद केंद्र शाळा राजापूर येथे संपन्न झालेल्या विभागस्तरीय एकदिवसीय कार्यशाळेत उपस्थित शिक्षकांना संबोधित करताना ते बोलत होते. कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी व सातारा या जिल्ह्यांमधून निवडक शिक्षक या कार्यशाळेत सहभागी झाले होते.
कार्यशाळेच्या प्रमुख मार्गदर्शिका असणाऱ्या खटाव पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी श्रीमती प्रतिभा भराडे मॅडम यांनी शैक्षणिक साहित्य पेट्यांच्या प्रभावी वापराबाबतचे प्रशिक्षण प्रात्यक्षिकातून उपस्थितांना दिले. भाषा, गणित, इंग्रजी या विषयांच्या साहित्यपेट्या व यावर्षी कृतीयुक्त अध्ययनासाठी मिळालेल्या इयत्ता पहिली ते चौथी वर्गासाठी अ आणि ब या पेट्यांतील साहित्याची सखोल व दिशादर्शक माहिती श्रीमती भराडे यांनी शिक्षकांना दिली.
चौकट करणे 👇🏻
राजापूर शाळेचे कार्य गौरवास्पद
शिष्यवृत्ती परीक्षा तसेच नवोदय व सैनिक स्कूल परीक्षा यामध्ये मागील पाच वर्षात राजापूर शाळेचे 25 विद्यार्थी यशस्वी झाले आहेत ही गौरवास्पद बाब असून शाळेने वर्ग आरेखन, साहित्य पेट्यांचा वापर, परिपाठ, वर्ग रचना, विषय कक्ष, प्रकाश योजना, गोष्टींची पुस्तक निर्मिती अशा अनेक उपक्रमांची केलेली प्रभावी अंमलबजावणी सर्वांसाठी दिशादर्शक असल्याचे गौरवोद्गार उपसंचालक महेश चोथे यांनी काढले .
आपल्या प्रास्ताविकात बोलताना डाएट कॉलेजचे प्राचार्य श्री. रामचंद्र कोरडे म्हणाले की, पारंपारिक पद्धतीच्या अध्यापन प्रक्रियेतून बाहेर येऊन काळाबरोबर शिक्षकांनी स्वतःमध्ये बदल करून घ्यायला हवा. ही कार्यशाळा शिक्षकांना निश्चितच नवी दिशा देईल असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला. यावेळी कोरेगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यशाळेस मायणी बीटाच्या विस्तार अधिकारी सोनाली विभुते, बुध बीटाच्या विस्तार अधिकारी संगीता गायकवाड, केंद्रप्रमुख प्रमोद जगदाळे, शिवाजीराव जाधव, मोहनराव साळुंखे, विषयतज्ञ गणेश पवार, लक्ष्मण जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
माननीय उपसंचालक, उपस्थित अधिकारी व विभागातील उपस्थित शिक्षक यांनी राजापूर शाळेतील सर्व वर्गांची पाहणी केली. वर्गातील व व्हरांडातील आरेखन, साहित्य पेट्यांचा वापर, शालेय परिपाठ, वर्ग रचना, साहित्य मांडणी, विषय कक्ष, प्रकाश योजना, गोष्टींची पुस्तक निर्मिती अशा अनेक उपक्रमांची माहिती यावेळी शाळेतील सर्व शिक्षकांनी उपस्थितांना करून दिली. यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी साहित्य वापराची विविध प्रात्यक्षिकेही करून दाखवली.
शाळेचे मुख्याध्यापक नितीन खोत यांनी सर्वांचे स्वागत केले. अजित चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले तर श्री. विनोद गोडसे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी रणसिंगवाडी शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल फडतरे, राजापूर शाळेच्या उपशिक्षिका सुवर्णा घनवट, वैशाखी साबळे, सविता राऊत, दत्तात्रय कर्णे, सतीश जाधव, लव्हेश चोरमले तसेच नागनाथ विद्यामंदिर बुध येथील मुख्याध्यापक व शिक्षक आदींनी खूप परिश्रम घेतल