कराड:-संक्रांतीनिमित्त ऊस तोडी कामगारांसाठी माणुसकीचा वान रेश्मा सुरेश पाटील यांचा स्तुत्य उपक्रम.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

संक्रांतीनिमित्त ऊस तोडी कामगारांसाठी माणुसकीचा वान रेश्मा सुरेश पाटील यांचा स्तुत्य उपक्रम.

कराड:- संक्रांती सणाचे औचित्य साधून ऊस तोडी कामगारांप्रती सामाजिक बांधिलकी जपत सौ.रेश्मा सुरेश पाटील पार्ले, ता. कराड, जि.सातारा यांनी ऊस तोडी कामगारांसाठी संक्रांतीनिमित्त वान वाटप करून माणुसकीचे दर्शन घडवले आहे.
ऊस तोडीत कष्टाने राबणाऱ्या कामगारांना सणाचा आनंद मिळावा, त्यांच्या कुटुंबात समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. वानामध्ये दैनंदिन उपयोगाच्या वस्तू देण्यात आल्या.
या स्तुत्य उपक्रमामुळे ऊस तोडी कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, रेश्मा पाटील यांच्या सामाजिक जाणिवेचे व माणुसकीच्या भावनेचे सर्वत्र कौतुक होत आहे. सणाच्या निमित्ताने गरजू घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचवणारे असे उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.




