वाई येथे आर्थिक समावेशन व री-केवायसी विशेष मोहिम यशस्वी.
पत्रकार सुरेखा भोसले वाई तालुका महिला कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
वाई येथे आर्थिक समावेशन व री-केवायसी विशेष मोहिम यशस्वी.
वाई : युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा वाई यांच्या सौजन्याने आर्थिक समावेशन योजनांसाठी आणि री-केवायसीसाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. ही मोहिम उत्साहात व मोठ्या प्रमाणावर यशस्वीरीत्या पार पडली.
या कार्यक्रमासाठी भारतीय रिझर्व बँकेचे उपमहाप्रबंधक श्री. हरिशंकर वर्मा, युनियन बँकेचे क्षेत्रीय प्रमुख पुणे मेट्रो श्री. मयंक भारद्वाज, बँक ऑफ महाराष्ट्राचे झोनल मॅनेजर श्री. सौरभ सिंग, सातारा विभागाचे एल.डी.एम. श्री. नितीन तळपे, युनियन बँकेच्या पुणे मेट्रोचे उपशेत्रीय प्रमुख श्री. विकास शिंदे, वाईचे एबीडीओ श्री. बाळासाहेब जाधव, गावच्या सरपंच सौ. चित्रा जाधव व पंचायत समिती सदस्य श्री. विराजभैया शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
या मोहिमेद्वारे ग्राहकांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली तसेच खातेधारकांचे री-केवायसी अद्ययावत करण्यात आले. ग्रामीण भागातील ग्राहकांनी या उपक्रमाला मोठा प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. कैलास दळवे यांनी केले. या प्रसंगी भारतीय रिझर्व बँकेचे उपमहाप्रबंधक श्री. हरिशंकर वर्मा यांनी ग्राहकांना आर्थिक समावेशन तसेच विमा योजनांबाबत मार्गदर्शन व जनजागृती केली. आभारप्रदर्शनही श्री. कैलास दळवे यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वाई शाखेचे शाखा प्रबंधक श्री. अरविंद कुमार, ग्रामीण विकास अधिकारी श्री. अशोक भिसे, श्री. राणी टेकाळे तसेच शाखेचे श्री. मंगेश जगदाळे, श्री. प्रकाश शिंदे व श्री. राहुल माने यांचे विशेष सहकार्य लाभले.