फलटण:-एक ऑक्टोबर रोजी पाहिले कुस्ती संमेलन आदर्की येथे भरणार.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
एक ऑक्टोबर रोजी पाहिले कुस्ती संमेलन आदर्की येथे भरणार.
भारतातीत पहिले कुस्ती संमेलन महाराष्ट्रात आदर्की येथे एक ऑक्टोबर रोजी संपन्न होणार आहे . यामध्ये महाराष्ट्रातील अनेक कुस्ती प्रेमी सहभागी होणार आहेत . त्या मध्ये महाराष्ट्रातील जुन्या काळातील पैलवान / कुस्तीगीर याचा पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे . अशी माहिती पै . संपतराव जाधव कुस्ती मित्र यानी दिली .
कुस्ती या खेळाचा प्रसार व प्रचार व खेळाडू , मार्गदर्शक यांना कुस्तीतील गतिमानतेन होणारे बदल व खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच कुस्ती या खेळासाठी अहोरात्र मेहनत घेऊन नवोदित कुस्तीगीर तयार करण्यात पुढाकार घेऊन आपले आयुष्य जगणाऱ्या वस्ताद याच्या साठी पुरस्कार देण्यात येणार आहेत .
⭐ऑलम्पीकवीर खाशाबा जाधव व ⭐ सन 1959 चे पहिले हिदं केसरी श्रीपती खंचनाळे यांना मरनोत्तर पुरस्कार यांना देण्यात येणार आहे . तसेच ⭐NIS कोच महालिंग खांडेकर व पै . सपतराव जाधव यांना ” राष्ट्रीय खलिपा – 2023 ” हा पुरस्कार देण्यात येणार आहे .
सदर संमेलना मध्ये कुस्ती व क्रीडा क्षेत्रातील विशेष कार्य करणाऱ्या कुस्ती / क्रीडा प्रेमीचा गुणगौरव करण्यात येणार आहे .
सदर कुस्ती संमेलन सुजन फौडेशन आदर्की बु . ॥ याच्या संयोजना खाली आदरकी येथे घेण्यात येणार आहे . त्या ठिकाणी सांगली , कोल्हापूर , सातारा , पुणे, मुंबई ,नाशिक सोलापूर ‘ तसेच सपूर्ण महाराष्ट्रातून कुस्तीगीर व कुस्ती प्रेमी तसेच सर्व क्रीड प्रेमी उपस्थित राहणार आहेत .
तेथे कुस्ती बदलते स्वरूप व येणाऱ्या समस्यांचे निवारण करण्यासाठी चर्चा सत्र आयोजीत करण्यात आले आहे . तसेच कुस्ती या खेळाचे प्रात्येक्षीक दाखवण्यात येणार आहे . त्यासाठी विविध कुस्ती संकुल , कुस्तीगीर पैलवान मुले व मुली सहभागी होणार आहेत .