महाबळेश्वर:-भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा पूर्व आणि पश्चिम कार्यकारिणी पुनर्गठन कार्यक्रम २२नोव्हेंबरला जाहीर – आयु.अशोक भालेराव जिल्हाध्यक्ष
पत्रकार उत्तम भालेराव महाबळेश्वर तालुकाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा पूर्व आणि पश्चिम कार्यकारिणी पुनर्गठन कार्यक्रम २२नोव्हेंबरला जाहीर – आयु.अशोक भालेराव जिल्हाध्यक्ष

भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेच्या माध्यमातून संपूर्ण भारतात कार्यरत असलेल्या भारतीय बौद्ध महासभेच्या सातारा जिल्ह्यातील सर्व गटांचे एकत्रिकरण करून सातारा जिल्हा एकसंघ करण्यासाठी जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी यांची पुनर्गठन सभा शनिवार दिनांक २२/११/२०२५ रोजी सातारा जिल्हा ग्रामसेवक भवन, शाहूनगर सातारा येथे सकाळी ११:३० वाजता संस्थेचे ट्रस्टी चेअरमन डॉ हरिश रावलिया साहेब, ट्रस्टी रिपोर्टिंग चेअरमन ॲड. सुभाष जौंजाळे साहेब, ट्रस्टी उपाध्यक्ष तथा केंद्रीय कार्यालय प्रमुख ॲड.एस.के.भंडारेसाहेब, ट्रस्टी आदरणीय अरुणभाऊ पोळ साहेब, राष्ट्रीय सचिव तथा महाराष्ट्र प्रभारी आदरणीय भिकाजी कांबळे साहेब, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आदरणीय यु.डी.बोराडे साहेब आणि राज्य संघटक, पूणे सातारा विभाग प्रभारी आदरणीय दादासाहेब भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
सातारा जिल्ह्यातील भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेशी एकनिष्ठ असलेले,राजगृहाशी एकनिष्ठ आजी माजी पदाधिकारी,केंद्रीय शिक्षक,बौद्धाचार्य, माजी श्रामणेर,समता सैनिक दल आणि बौद्ध बांधव यांनी या सभेसाठी उपस्थित रहावे असे आवाहन आयु.अशोक भालेराव जिल्हाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा पश्चिम आणि कार्यकारिणी पदाधिकारी यांचे वतीने करण्यात येत आहे.




