ताज्या घडामोडी

सातारा:-(वडूज)-मंत्री गोरेंशी फराकत घेतलेले वडुज नगराध्यक्ष काळे विरोधात अविश्वास ठराव दाखल…..

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

मंत्री गोरेंशी फराकत घेतलेले वडुज नगराध्यक्ष काळे विरोधात अविश्वास ठराव दाखल…..

सातारा दि: वडूज नगरपंचायतीच्या वादग्रस्त नगराध्यक्ष सौ मनीषा काळे यांना वारंवार संधी देऊन सुद्धा त्यांच्या कामकाजामध्ये परिवर्तन घडले नाही. असा आरोप करत वडूज नगरपंचायतीच्या सर्व सदस्यांनी त्यांच्या विरोधात सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर अविश्वास ठराव दाखल केली.

वडूज नगरपंचायत हि नव्याने स्थापन झालेली
असून वडुज नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक जानेवारी २०२२ रोजी झालेली आहे. त्यामध्ये ९ महिला सदस्य व ८
पुरुष सदस्य असे एकूण १७ सदस्य निवडून आले आहेत. वडुज नगरपंचायतीची नगराध्यक्षा व उपनगरांध्यक्ष पदाची
निवड दिनांक ११ फेब्रुवारी २०२२ रोजी झाली. त्यामध्ये नगराध्यक्षा म्हणून अपक्ष नगरसेविका सौ. मनीषा रविंद्र काळे यांची निवड झाली होती परंतु ज्या उद्देशाने नगरपंचायत सदस्यांनी सौ. मनीषा रविंद्र काळे यांची नगराध्यक्षा म्हणून निवड केली होती
त्या उद्देशास नगराध्यक्षानी हरताळ फासला आहे. नगराध्यक्षा या पदावर आल्यापासून चुकीच्या पध्दतीने वागत आहेत..त्या
कोणत्याही सदस्याला विश्वासात घेऊन काम करीत नाहीत. मनमानी पद्धतीने वागत आहेत. त्यांच्या या चुकीच्या
वागण्यामुळे शहराच्या विकासावर परिणाम होत आहे. नगराध्यक्षा म्हणून शहराच्या विकासासंदर्भात आतापर्यंत कोणतीही
भूमिका घेतली नाही तसेच जबाबदारी पार पडली नाही. त्यामुळे आम्ही खाली सही करणार सर्व नगरसेवक व नगरसेविका
अविश्वास ठराव मांडणेबाबत स्वतः मागणी करीत आहोत. आमचेवर कोणाचाही दबाव नाही. म्हणून आम्ही या खाली सही
करणार सर्व नगरसेवक व नगरसेविका नगराध्यक्षा सौ.मनीषा रविंद्र काळे यांचेवर अविश्वास ठराव दाखल करीत
आहोत व तो मंजूर होनेकामी विशेष सभा बोलविणेत यावी हि विनंती निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी नगरसेवकाचे
सौ. आरती श्रीकांत काळे,सौ. राधिका गिरीश गोडसे,श्री. मनोज रामचंद्र कुंभार,श्रीमती. शोभा दीपक बडेकर, सौ. रेखा अनिल माळी, सौ. रेश्मा श्रीकांत बनसोडे,श्री. सोमनाथ नारायण जाधव
श्री. बनाजी दिनकर पाटोळे,सौ.शोभा तानाजी वायदंडे,श्री. ओंकार दिलीप चव्हाण,श्री. अभयकुमार विठ्ठलराव देशमुख,,सौ. स्वप्नाली गणेश गोडसे,श्री.सुनील हिंदुराव गोडसे,सौ. रोशना संजय गोडसे,
श्री. जयवंत माधवराव पाटील,श्री. सचिन तुकाराम माळी व वरुण नगरपंचायतीचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्राध्यापक बंडा गोडसे अनिल माळी व मान्यवर उपस्थित होते सदर निवेदनाची प्रत
मुख्याधिकारी, वडुज नगरपंचायत वडुज यांना माहितीसाठी सादर केली आहे.
दरम्यान ,वडूज नगराध्यक्ष सौ मनिषा काळे या अपक्ष नगरसेविका निवडून येऊन त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटात गेल्या व नगराध्यक्ष झाल्या. त्यानंतर त्यांनी भाजप गोटात प्रवेश केला होता .आता त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल झाल्याने वडूज नगरीत राजकीय दृष्ट्या ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्याशी फारकत घेतल्याने अविश्वास ठराव दाखल झाला असून नवीन नगराध्यक्ष पदासाठी आतापासूनच मोर्चा बांधणी सुरू झालेली आहे.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

______________________________________________
फोटो सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडे वडूज नगराध्यक्ष अवश्य ठराव दाखल करताना नगरसेवक व नगरसेविका (छाया- अजित जगताप सातारा)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button