आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुणे:-बावधन येथील वन्यप्राणी उपचार केंद्र सुरू.

पत्रकार मारुती सोमुत्ते पुणे जिल्हा उपाध्यक्ष:-7447515129

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार मारुती सोमुत्ते पुणे जिल्हा उपाध्यक्ष

बावधन येथील वन्यप्राणी उपचार केंद्र सुरू.

पुणे, दि. ११ : वन्य प्राण्यांचे स्थलांतर, देखभाल, उपचार नियोजनाची व्यवस्था व इतर आवश्यक बाबींची पूर्तता करून बावधन येथील वन्यप्राणी उपचार केंद्राच्या कामास प्रत्यक्षात सूरूवात झाल्याची माहिती वन विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.

देखभाल व उपचार नियोजनासाठी वन्यप्राणी या विषयात तज्ज्ञ असणाऱ्या ३ संस्थांनी मुख्य वन संरक्षक यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीसमोर सादरीकरण केले. समितीने दिलेल्या गुणांच्या अनुषंगाने रेस्क्यू (आरइएसक्यू) धर्मादाय ट्रस्ट, पूणे या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. बावधन येथील वन्यप्राणी उपचार केंद्राची देखभाल व उपचार नियोजन व्यवस्था करण्याकरिता संस्थेसोबत करार करून केंद्राचे हस्तांतरण करण्यात आले आहे.

संस्थेचे प्रतिनिधी, वनविभागाचे कर्मचारी व वास्तू सल्लागार यांनी सामाईक पाहणी करून वन्यप्राणी उपचार केंद्र वन्य प्राण्यांचे स्थलांतर करण्याकरिता काही बाबींची पूर्तता आवश्यक असल्याचे कळविले होते. त्यानुसार आवश्यक बाबींची पुर्तता करून ७ सप्टेंबरपासून वन्यप्राणी उपचार केंद्र सुरु करण्यात आले आहे. सद्यस्थितीत एकूण १३८ वन्यप्राणी व पक्ष्यांवर याठिकाणी उपचार सुरु आहेत.

पश्चिम महाराष्ट्रातील हे सर्वात मोठे वन्यप्राणी उपचार केंद्र असून जखमी अथवा मानवी वस्तीत वन्यप्राणी आढळल्यास नागरिकांनी वन विभागाच्या १९२६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन उप वनसंरक्षक महादेव मोहिते यांनी केले आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button