फलटण:-मदनेनायकुडेवस्ती ग्रामस्थांकडून धन्यकुमार तारळकर यांना सन्मान पत्र प्रदान.
सह - संपादक अशितोष चव्हाण:-7378619519

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
सह – संपादक अशितोष चव्हाण
मदनेनायकुडेवस्ती ग्रामस्थांकडून धन्यकुमार तारळकर यांना सन्मान पत्र प्रदान.
जि. प. प्राथमिक शाळा मदनेनायकुडेवस्ती. केंद्र -निंभोरे. ता.फलटण. जि. सातारा. येथे कार्यरत असणारे श्री.धन्यकुमार प्रल्हाद तारळकर यांना महाराष्ट्र राज्य शासनाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार. ५ सप्टेंबर, २०२३ रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री मा.श्री.अजितदादा पवार, शालेय शिक्षण मंत्री मा.श्री.दीपक केसरकर इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. त्याबद्दल सन्माननीय श्री.तारळकर यांचा शालेय व्यवस्थापन समिती व समस्त ग्रामस्थ मदनेनायकुडेवस्ती (निं) यांच्यामार्फत आज सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
‘कार्य करीत राहिलात आपण निरपेक्ष मनाने
ठाव घेतला मनाचा आपल्या सत्कार्याने
कार्यासह आपणांस वंदनाचा राजयोग आला
हृदयी गुंफितो प्रेमभराने सन्मानपत्र माला’
प्रथमतः अभिनंदन !अभिनंदन !!मनःपूर्वक अभिनंदन !!!आज आपणास ‘राज्यस्तरीय पुरस्कार’प्राप्तीच्या निमित्ताने हे सन्मानपत्र प्रदान करताना आम्हांस विशेष अतीव आनंद आणि अभिमान वाटत आहे.श्री.धन्यकुमार तारळकर हे उच्च विभूषित असून त्यांच्या अथांग ज्ञानाच्या जोरावर त्यांनी अनेक गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडवले. त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेले आहे.असे मत माजी मुख्खा.विजय जगताप यांनी काढले. शिक्षक हे राष्ट्राचे खरे मार्गदर्शक, आधारस्तंभ. समाज आणि राष्ट्र यांच्या जडणघडणीत शिक्षकांच्या कार्याचा अतुलनीय वाटा असतो. आपण आपल्या कर्तृत्वाने आपल्या शाळेत, गावात, तालुक्यात, जिल्ह्यात आणि आता राज्यात आपला ठसा उमटवला आहे.आपल्या शाळेच्या आणि गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोचण्यासाठी सदैव तत्पर आणि प्रयत्नशील आहात. शैक्षणिक कार्य आणि सामाजिक क्षेत्रात कर्तव्यासाठी कटीबद्ध आहात याचा विशेषत्वाने उल्लेख करावासा वाटतो. यानिमित्ताने आपल्या हातून देशसेवा घडत आहे. समाजासाठी आपले कार्य अतुलनीय, आदर्शवत आहे.म्हणूनच म्हणावेसे वाटते, शाळा व्यवस्थापन समिती मदनेनायकुडेवस्ती, निंभोरे यांचेतर्फे आपणास आपल्या धैर्य आणि कर्तृत्वाला मानाचा सलाम करीत हे सन्मानपत्र बहाल करताना अत्यानंद होत आहे. आपण आपल्या आदर्शाप्रमाणे सदैव आमच्या स्मरणात राहाल हीच मनोकामना. आपले पुढील आयुष्य असेच देशाच्या सत्कारणी लागो ही या मंगल प्रसंगी सदिच्छा आणि आपल्या कार्यास आभाळभर शुभेच्छा ! शा. व्य. स.मदनेनायकुडेवस्ती (निंभोरे ) सर्व सदस्य व अध्यक्ष, केंद्रप्रमुख श्री. बन्याबा पारसे, मा.कदम मॅडम वैद्यकीय अधिकारी निभोरे,रुपाली अडसूळ अंगणवाडी सेविका,आशा सेविका तसेच पालक वर्ग, मित्रपरिवार, नातेवाईक,ग्रामस्थ यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.