श्रीरामपूर:-सरला येथील ॲड.अण्णासाहेब मोहन मित्र मंडळ तर्फे भीम जयंती उत्साहात साजरी..
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
सरला येथील ॲड.अण्णासाहेब मोहन मित्र मंडळ तर्फे भीम जयंती उत्साहात साजरी..
तथागत गौतम बुद्ध मूर्ती प्रांगणात १३४वी भीम जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीस समाजातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीचे तालुका संघटक मा.रमेश दिवे , सरला विविध सहकारी सोसायटीचे संचालक मा. संभाजी उबाळे, वंचित बहुजन आघाडीचे गटप्रमुख मा. अशोकराव मोहन या त्रिमूर्तीच्या हस्ते दीप धूप लावून व पुष्प फुले अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे अहिल्यानगर जिल्हा उत्तर कायदेविषयक सल्लागार सामनेर ,बौध्दाचार्य, प्रसिद्ध फुले प्रेमी कवी ॲड .अण्णासाहेब मोहन यांनी सर्वांना त्रिशरण पंचशील देऊन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले , उपासिका सांची मोहन हिने मंजुळ स्वरात भीमस्तुतीचे पठण केले. वंचित बहुजन आघाडीचे तालुका संघटक मा.रमेश दिवे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजासाठी केलेल्या परिश्रमाची आणि त्यागाची आठवण करून देत सर्वांना भीम जयंतीच्या शुभेच्छा दिल्या . वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ सल्लागार तथा गटप्रमुख मा.ट,अशोकराव मोहन यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याचे स्मरण करून अभिवादन करत जेष्ठ विधीतज्ञ ॲड. अण्णासाहेब मोहन यांनी बाबासाहेबाचा समाजासाठी दिलेला उपदेश ,”शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा”, यांवर आपले विचार व्यक्त करताना शिक्षण आपल्या लेकरांसाठी महत्त्वाचा विषय असुन त्याशिवाय तरणोपाय नाही , त्या काळी शिक्षणासाठी बाबासाहेबांनी घेतलेले कष्ट आणि रामजी बाबांनी खाललेल्या खस्ता पाहता बाबासाहेबांनी आपल्याला संविधानिक, शैक्षणिक अधिकार देऊन आपणावर फार मोठे उपकार केले आहेत .त्या उपकाराची परतफेड कशानेही होऊ शकणार नाही, परंतु प्राप्त परिस्थितीत शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा नारा अधिक बुलंद करावा लागेल,असे आव्हान सर्व समाज बांधवांना केले. शेवटी सामाजिक कार्यकर्ते आयु.आप्पासाहेब मोहन यांनी सर्वांचे आभार मानले. भीम जयंती आनंद उत्सव खीर व मिठाई वाटून व्यक्त करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे सरला ग्राम अध्यक्ष मा. प्रवीण दिवे, सामाजिक कार्यकर्ते आयु.अमर मोहन,इलेक्ट्रिक इंजिनिअर मा. अभिषेक मोहन, मास्टर स्वराज मोहन,उपासीका सांची मोहन, उपासिका आरती मोहन इत्यादीने परिश्रम घेतले, महिलांमध्ये आशा सेविका अंजूताई मोहन व उमेद अभियानाच्या सी आर पी ताई सारिका मोहन यांची प्रमुख उपस्थिती होती.