कराड:-व्यायामासाठी एक तास द्या आणि शंभर वर्षे जगा: प्रा.डॉ. संजय पाटील.
प्रतिनिधी प्रा.संतोष बोंगाळे कराड:-9923900840

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
व्यायामासाठी एक तास द्या आणि शंभर वर्षे जगा: प्रा.डॉ. संजय पाटील.
कराड : (प्रतिनिधी )ग्रामीण विकास शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालय उंडाळे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विशेष श्रम संस्कार शिबिरामध्ये ‘एक तास द्या आणि शंभर वर्षे जागा ‘ या विषयावर प्रा.डॉ.संजय पाटील हे बोलत होते.
आज आधुनिक जीवनशैलीमध्ये आपल्या दैनंदिन व्यवहारांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. पूर्वी लोक पहाटे उठून, कसरत करून शेतीची कामे करत. त्यांच्या आहाराचे नियोजन चांगले होते. त्यामुळे लोकांच्याकडे शक्ती व आरोग्य चांगलं होतं. आता बैठी कामे वाढली आहेत. सतत कॉम्प्युटर , लॅपटॉप व मोबाईलवर राहणे यामुळे शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत. त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. आज बी.पी., शुगर हे आजार वाढले आहे. हार्ट अटॅक , ब्रेन अटॅक याचे प्रमाण लक्षणीय आहे. फास्ट फूड संस्कृतीमुळे आपल्या शरीरात केमिकल युक्त पदार्थ मोठ्या प्रमाणात जातात त्यामुळे कॅन्सर पेशंट मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. या सर्व गोष्टीचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. प्रत्येकाने दररोज एक तास आपल्या स्वतःच्या जीवनासाठी व्यायाम करणे अत्यंत गरजेचे आहे. २४ तासांपैकी एक तास व्यायाम करा आणि शंभर वर्ष जगा. पूर्वी लोक सहज १०० वर्षे जगत, कारण ते व्यायाम करत होती, शारीरिक मेहनत करत होती, त्याचा आहार सात्विक होता. या गोष्टीकडे आज गांभीर्याने बघण्याची गरज आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. शंकर हरी पाटील (आबा), सौ. रेखा साळुंखे , ग्रामस्थ व शिबिरार्थी स्वयंसेवक हजर होते. या कार्यक्रमाचे आयोजन प्रकल्प अधिकारी प्रा.प्रदीप चोपडे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रा.हणमंत पिसाळ आणि प्रशासकीय कर्मचारी यांनी केले.