मोहडेकरवाडी:-(वाई)-महिलांच्या सक्षमीकरणासाठी कुकुटपालनाचा पुढाकार; सेवा सहयोग फाउंडेशनचा उपक्रम यशस्वी.
पत्रकार जीत बांदल सुरूर विभाग प्रमुख HOD

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

महिलांच्या सक्षमीकरणासाठी कुकुटपालनाचा पुढाकार; सेवा सहयोग फाउंडेशनचा उपक्रम यशस्वी.

सुरूर विभाग प्रतिनिधी जीत बांदल
सातारा | दिनांक २८ मार्च २०२६
सेवा सहयोग फाउंडेशनच्या वतीने शेतीस पूरक जोडधंदा म्हणून कुकुटपालन प्रकल्प राबविण्यात आला असून या अंतर्गत महिलांना कोंबडी खाद्याचे वाटप करण्यात आले.
मा.अक्षय सोनवणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प यशस्वीपणे पार पडला. तसेच प्रणाली चव्हाण मॅडम यांचेही मोलाचे योगदान लाभले.
तालुका वाई, जिल्हा सातारा येथील मोहोडेकरवाडी, सुरूर येथील जीत अँग्रो फार्मवरून घरगुती पद्धतीने तयार केलेले नैसर्गिक कोंबडी खाद्य व व्हिटामिन महिलांना वितरित करण्यात आले. यामुळे कोंबड्यांची सुदृढ वाढ होऊन अंडी उत्पादनासाठी आवश्यक पोषक घटक मिळतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कुकुटपालन व्यवसायामुळे महिलांना कमी भांडवलात व कमी मेहनतीत उत्पन्नाचे साधन उपलब्ध होत असून घरखर्च चालविण्यास मोठी मदत होत आहे. त्यामुळे अनेक महिला या व्यवसायाकडे वळत असून आर्थिक प्रगतीची दिशा मिळत आहे.
ज्या महिलांना कुकुटपालन व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी मोहोडेकरवाडी येथील जीत अँग्रो फार्मला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. येथे ब्लॅक ऑस्ट्रोलॉर्प, सोनाली आणि कावेरी जातीची पिल्ले ऑर्डरनुसार उपलब्ध असून लसीकरणाबाबत मार्गदर्शनही केले जाते.
संपर्क:
जीत शिवाजी बांदल
मो. ९७६३८१५११७



