खटाव:-आ.डॉ.दिलीपराव येळगावकर यांनी मला माझ्यातील प्रतिभा दाखवली – किरण जाधव.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक:-9890318605

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा.पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक
आ.डॉ.दिलीपराव येळगावकर यांनी मला माझ्यातील प्रतिभा दाखवली – किरण जाधव.
मायणी प्रतिनिधी—
खटाव तालुक्याचे माजी आमदार डॉ.दिलीपराव येळगावकर यांनी माझ्यातील प्रतिभा दाखवून दिली आणि सलग ४ वर्षे माझ्या लेखन कार्यात खंबीरपणे पाठीशी उभे राहिले. त्यामुळे मी यज्ञकुंड स्वातंत्र्याचे हे पुस्तक लिहू शकलो असे उद्गार स्फूर्ती शिक्षण संस्थेचे संचालक किरण जाधव यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना काढले. याप्रसंगी त्यांचा संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप पुस्तके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. माझ्यासारख्या एका छोट्या माणसाचा मोठा सत्कार केल्याबद्दल त्यांनी संस्थेला धन्यवाद दिले. याप्रसंगी संस्थापक सचिव पांडुरंग तारळेकर,कार्याध्यक्ष राजाराम कचरे,प्रा.संभाजी देसाई,ज्येष्ठ साहित्यिक सुहास पवार,डॉ. संतोषडांगे, मुख्याध्यापक सुनिल यलमर,दिपक खलीपे आदि उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना प्रसिध्द वक्ते संभाजी देसाई म्हणाले,हिमालयाची उंची त्याच्या अंगा खांद्यावर खेळणाऱ्याला कळत नाही.ती कळण्यासाठी हिमालयापासून थोडेसे दूर जावे लागते. किरण जाधव हे उत्कृष्ट वक्ते,उत्कृष्ट लेखक व उत्कृष्ट प्रशासक आहेत.त्यांच्याकडे वैचारिक वारसा आहे.असे सांगून विद्यार्थ्यांना उद्दशून ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता वाढवली पाहिजे.भारताच्या भवितव्याची शाल म्हणजे शिक्षक होय.गुरूचे स्थान हे पंतप्रधान पदापेक्षा मोठे आहे.शिक्षण हे शस्त्र आहे त्याने तुम्ही तुमचे जग बदलू शकता.शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. यावेळी पांडुरंग तारळेकर,राजाराम कचरे, दिलीप पुस्तके,ज्येष्ठ लेखक सुहास पवार यांचीही भाषणे झाली. या कार्यक्रमाला सर्व शिक्षक,शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.