श्रीरामपूर:-मुरकुटेंच्या वाढदिवसानिमित्त शहरातील १० हजार लोकांचा काढणार मोफत विमा.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपुर तालुका अध्यक्ष:-9921180022

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपुर तालुका अध्यक्ष:-9921180022
मुरकुटेंच्या वाढदिवसानिमित्त शहरातील १० हजार लोकांचा काढणार मोफत विमा.
श्रीरामपूर :– अशोक उद्योग समुहाचे सर्वेसर्वा माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीरामपुर शहरातील सुमारे १० हजार नागरीकांना मोफत विम्याचे सुरक्षा कवच देण्यात येणार असुन आज गुरुवारी मुरकुटे यांच्या वाढदिवसानिमित्त या योजनेचा शुभारंभ झाला माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या वाढदिवसानिमित्त लोकोपयुक्त उपक्रम राबविण्याचा निर्णय गणेशसिंग राजपुत आणि संकेत संचेती यांच्या मित्र मंडळाने घेतला श्रीरामपुर शहरातील भागाभागातील दिव्यांग तसेच इतर नागरीकांसाठी १ लाख रुपयांचा मोफत विमा काढण्यात येणार आहे . यामध्ये राहणार असून दुर्दैवाने कोनाचा अपघाती मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला १ लाख रुपये मिळणार आहे तर कोणाचा दुदैवाने अपघात झाला तर २० हजारांपर्यतचा हॉस्पीटलचा खर्च या विक्याच्या माध्यमातुन मोफत होणार आहे श्रीरामपुर शहरातील भागाभागातील १० हजारांहून अधिक लोकांना या नागरीक सुरक्षा पॉलिसीचे वाटप करण्यात येणार आहे . आज सकाळी या सामाजिक उपक्रमाचे उद्घाटन माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्याहस्ते झाले भाऊसाहेब कांबळे अशोक बॅकेचे चेअरमन एस एस चौधरी . ओरिएन्टल इन्शुरन्सचे मॅनेजर सागर जावळे संकेत संचेती . अमोल कलांगडे पोफळे काका यांन्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित . होते आजपासुन सुरु झालेला हा उपक्रम शहरातील प्रत्येक भागात राबविण्यात येणार असून प्रत्येक भागातील गरजू नागरिकांना याचा लाभ गणेशसिंग राजपूत आणि संकेत संचेत मित्र मंडळाच्या वतीने देण्यात येणार आहे ज्यांना या . योजनेचा लाभ घ्यावयाचा असुन त्यांनी 7020584415 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधुन लाभ घ्यावा असे आवाहन गणरोसिंग राजपुत आणि संकेत संचेती . मित्र मंळाच्या वतीने करण्यात आले आहे