छ.संभाजीनगर:-विघ्नहर्त्याच्या उत्सवात विघ्न नकोच, पोलिसांच्या सुट्ट्या रद्द तसेच पाणीपुरवठा सुरुळीतच ठेवला जाणार.
पत्रकार अमोल चव्हाण गंगापूर तालुका संघटक:-7397937231

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार अमोल चव्हाण गंगापूर तालुका संघटक
विघ्नहर्त्याच्या उत्सवात विघ्न नकोच, पोलिसांच्या सुट्ट्या रद्द तसेच पाणीपुरवठा सुरुळीतच ठेवला जाणार.
लाडक्या बाप्पाला घरी आणण्यासाठी सध्या शहरवासियांची लगबग सुरू आहे. आकर्षक सजावट कालच करण्यात आली असून, आज बाप्पाला घरी आणायचे असल्याने त्यादृष्टीने सकाळपासून तयारी सुरू झाली आहे. गुलमंडीपासून टीव्ही सेंटर अन् गजानन महाराज मंदिर मार्केटपासून तर वाळूज पंढरपुरातील मार्केटपर्यंत सगळीकडे मूर्ती विक्रेते, मखर साहित्य विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. त्यांच्याकडे सकाळपासून गर्दी सुरू आहे. आपला बाप्पाच कसा छान असेल आणि इतरांपेक्षा भारी दिसेल यासाठी चिमुकल्यांचे प्रयत्न सुरू आहेत. दुपारी १२.४० वाजेपासून सायंकाळपर्यंत मूर्ती स्थापनेचा मुहूर्त उत्तम आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील छत्रपती संभाजीनगर शहरात तब्बल २ हजार ७०० पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. ३३३ ठिकाणी फिक्स पॉइंट लावलेले असून, यातले २१ फिक्स पॉइंट महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात आले. पाच ठिकाणी वॉच टॉवर, सहा ठिकाणी चेक पोस्ट आणि गल्लीबोळात पायी गस्त असे बंदोबस्ताचे नियोजन केलेले आहे. पोलिसांच्या सर्व प्रकारच्या रजा (साप्ताहिक सुट्या व वैद्यकीय रजा वगळता) रद्द करण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांच्या मार्गदर्शनाखाली तीन उपायुक्त, ५ सहायक आयुक्त, २८ पोलीस निरीक्षक, ७४ सहायक निरीक्षक व उपनिरीक्षक, १ हजार ५९० पुरुष तर ११५ महिला अंमलदार बंदोबस्तावर असतील.
महापालिका पाणीपुरवठा विभागाने गणेशोत्सवात पाणीविघ्न येऊ नये म्हणून काळजी घेतली आहे. जलकुंभासह जलवाहिन्यांवर लक्ष ठेवण्यासाठी २४ तास कर्मचाऱ्यांची तैनाती केली आहे. टप्पे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देशही लाइनमनला दिले आहेत. कार्यकारी अभियंता के. एम. फालक यांनी ही माहिती दिली.