फलटण:-कार्यकर्तृत्वच नव्हे तर मनाचाही मोठा नेता : समशेरबहाद्दर नाईक निंबाळकर.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS
कार्यकर्तृत्वच नव्हे तर मनाचाही मोठा नेता : समशेरबहाद्दर नाईक निंबाळकर.
फलटण प्रतिनिधी : सत्ता आल्यानंतर मानपान, मोठेपणा, दिखावा त्यांचबरोबर प्रसिद्धीसाठी अनेक जण हपापलेले आपण पाहतो, मात्र या सर्वांपासून दूर राहत जनता हेच माझे दैवत मानणारे व त्यांच्या बरोबर त्यांच्या खांद्यावर हात ठेवणारे नेते म्हणजे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे मोठे बंधू आणि फलटण नगर परिषदेचे माजी विरोधीपक्ष नेते समशेरबहाद्दर नाईक निंबाळकर होय असे म्हणण्याचे कारणही तसेच खास आहे.
आज मंगळवार दि. ३० एप्रिल रोजी माढा लोकसभा मतदार संघातील उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ माळशिरस या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहिर सभा लाखोंच्या उपस्थितीत संपन्न झाली. या सभेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री सदाभाऊ खोत, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. एवढ्या मोठ्या सभेस मान्यवर व्यासपीठावर बसण्यासाठी आतुर झालेले असतात मात्र समशेरबहाद्दर नाईक निंबाळकर यांनी व्यासपीठावर न बसता सहकारी नगरसेवक व इतर पदाधिकाऱ्यांच्या बरोबर सर्वसामान्य कार्यकर्त्यांसारखे व्यासपीठा समोर बसूनच सभेला हजेरी लावली.
सर्वसामान्य माणसासोबत सर्वसामान्यपणे वागणारा नेता म्हणून समशेरबहाद्दर नाईक निंबाळकर यांची ख्याती असून सर्वसाधारण राहणं काय असतं हे आज त्यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिले. त्यांच्या या कृतीमुळे मोठा मतदार वर्ग त्यांच्याकडे आकर्षित होत आहे.वास्तविक पाहता समशेरबहाद्दर नाईक निंबाळकर यांचा फलटण शहरा बरोबर तालुक्यात मोठा जनसंपर्क आहे. माढा मतदारसंघासहित फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रचाराची संपूर्ण जबाबदारी समशेरबहाद्दर नाईक निंबाळकर मोठया खुबीने हाताळत आहेत. त्यांचा जनसंपर्क व प्रचाराची आघाडी बघता खासदार रणजितसिंह यांना मोठे मताधिक्य मिळेल असे बोलले जात आहे.