माळेवाडी:-बालव्याख्याता साई मोहन यांचा जनकल्याण फाउंडेशनतर्फे गौरव ! राष्ट्र संत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त सन्मान.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
बालव्याख्याता साई मोहन यांचा जनकल्याण फाउंडेशनतर्फे गौरव ! राष्ट्र संत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त सन्मान.
माळेवाडी ( प्रतिनिधी ) जनकल्याण फाउंडेशन गोंडेगाव तालुका नेवासा जिल्हा अहिल्याबाई नगर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली .या निमित्ताने पुरस्कार वितरण आणि कवी संमेलन सोहळा आयोजित करण्यात आला . यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळेवाडी येथील बालव्याख्यानता साई उत्तम मोहन याने आपल्या आठ मिनिटांच्या भाषणात रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज ग्राम गीतकार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी समर्पण मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला उपस्थित उपप्रादेशिक अधिकारी राणी सोनवणे मॅडम तसेच पीएसआय राणी जाधव मॅडम माजी पोलीस अधिकारी क्राईम ब्रांच अहिल्याबाईनगर सुभाष सोनवने जनकल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष पांडुरंग रोडगे ‘ ज्येष्ठ साहित्यिक सुभाष दादा कर्डक सुमनताई तिजोरे ग्रामीण कवी आनंदा साळवे गझलकार रज्जाक शेख यांच्या शुभहस्ते साईला सन्मानचिन्ह सन्मानपत्र . ग्रामगीता आणि गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले . या सन्मानाबद्दल सरपंच ‘ उपसरपंच माळेवाडी . विविध कार्यकारी सोसायटी माळेवाडी शाळा व्यवस्थापन समिती माळेवाडी मुख्याध्यापक व शिक्षण वृंद यांच्याकडून साई मोहन चे कौतुक करण्यात आले.