ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सातारा:-रिपब्लिकन पक्षाच्या वतीने दलित अन्याय विरोधात जनआक्रोश आंदोलनाची तयारी.

पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पत्रकार अजित जगताप सातारा

रिपब्लिकन पक्षाच्या वतीने दलित अन्याय विरोधात जनआक्रोश आंदोलनाची तयारी

सातारा दि: संपूर्ण महाराष्ट्रात दलित बांधवांवर अन्याय अत्याचार होत आहेत. याची जाणीव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या( आठवले गट) कार्यकर्त्यांना झाली आहे. त्यामुळे सामान्य जनतेचा आक्रोश मांडण्यासाठी सातारा जिल्ह्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मंगळवार दि.२० जून रोजी दुपारी जन आक्रोश आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन सातारा जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी दिला आहे.
आज सातारा जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी रिपब्लिकन पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. महाबळेश्वर, पाचगणी सारख्या पर्यटनाच्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी होऊ लागलेली आहे. याचाच फायदा घेऊन बेकायदेशीर टोल वसुली तसेच पर्यटकांची गैरसोय होऊन सुद्धा त्यांच्यावर प्रवाशी कर आकारणी केली जाते. त्यामुळे पाचगणी महाबळेश्वर सारखं पर्यटन स्थळ बदनाम होत आहे. वन वे म्हणजे जाताना वाई मार्गी पाचगणी व येताना कुडाळ मार्गी पुणे, सातारा असे नियोजन गैरसोयी चे होणार आहे.
नोकरी- व्यवसाय, शिक्षण, व्यापार स्थानिक उद्योग संस्था यावर परिणाम होणार आहे. त्याविरोधात ही लढा उभारण्यासाठी रिपब्लिकन कार्यकर्ते तयार झालेले आहेत. असे ही श्री गायकवाड यांनी सांगितले.
याची राज्य शासनाने दखल घ्यावी म्हणून त्याचा भाग म्हणून रिपब्लिकन वतीने आंदोलनाची भूमिका घेतली असून या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे असे त्यांनी आवाहन केले आहे. यावेळी आप्पासाहेब गायकवाड, प्रतिक गायकवाड, अशोक मदने, डॉ तात्यासाहेब जगताप, कुणाल गडांकुश, पूजा बनसोडे, स्वप्निल गायकवाड, आप्पा तुपे यांच्यासह तालुकाध्यक्ष, स्थानिक पातळीवर मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.

__________________________________

फोटो – रिपब्लिकन पक्षाच्या बैठकीत चर्चा करताना मान्यवर (छाया – अजित जगताप,सातारा)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button