आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

साताऱ्यात रिक्षावाल्याच्या कटमुळे क्लासवाल्या नाल्यात…

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS

साताऱ्यात रिक्षावाल्याच्या कटमुळे क्लासवाल्या नाल्यात…

सातारा दि: अशी ही साताऱ्याची तऱ्हा असे म्हणण्याची पाळी अनेकांवर आली आहे .सातारा शहरातील बसस्थानका मागील पारंगे चौकात एका रिक्षावाल्याच्या कटमुळे क्लास वाल्या व्यक्तीला दुचाकीसह नाल्यात पडण्याचा प्रकार घडला. यामुळे काही रिक्षाचालकांची अरेरावी व मनमानी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला आहे.
याबाबत माहिती अशी की, सातारा शहरांमध्ये रिक्षांचे प्रमाण वाढलेले आहे. तीन ऐवजी सहा प्रवासी घेऊन जाणाऱ्या काही रिक्षा चालकांसाठी असणारा बिल्ला व गणवेश न घालणे. एवढेच नव्हे तर काही रिक्षा चालक चक्क दारू पिऊन रिक्षा चालवत असल्याची बाब सर्वांनाच माहित आहे. अशाच एका रिक्षाचालकाच्या घाईगडबडीने श्रावणी सोमवारी दुपारी पावणेदोन वाजता सातारा शहरातील पारंगे चौकात दुचाकी चालकाला कट मारल्यामुळे बिचार्‍या क्लास वाल्या एका व्यक्तीला शेजारील नाल्यात दुचाकीसह जीव वाचवण्यासाठी पडावे लागले.
या वेळेला राष्ट्रवादी भवन मध्ये आ. शशिकांत शिंदे यांच्या जनता दरबार निमित्त आलेल्या कोरेगाव तालुक्यातील विनोद भोसले, बिपिन मोरे व शिवसेना (उबाठा )गटाचे गणेश अहिवळे, युवराज पाटील, विकी निंबाळकर यांनी माणुसकी भावनेतून मदत करून त्या क्लास वाल्यांना रस्त्याच्या शेजारील नाल्यातून सुखरूप बाहेर काढले. बिचाऱ्याची कोणती चूक नसताना रिक्षाचालकाच्या अतीघाई गडबडीमुळे जीव वाचवण्यासाठी नाल्याचा आश्रय घ्यावा लागला. याच नाल्यात त्यांच्या काही वस्तू पडल्या . त्या गोळा करण्यासाठी बिचार्‍याची धडपड सुरू होती. सदरचा प्रसंग जर त्या ठिकाणी सी.सी.टी.व्ही. असेल तर निश्चितच दिसून येईल .त्या आधारे संबंधित रिक्षाचालकावर कारवाई होऊ शकते. हा प्रसंग दुपारी पावणे दोन वाजता घडला त्यावेळेला सातारा वाहतूक शाखेची एक वाहन त्या ठिकाणी होऊन निघाले होते असे प्रथमदर्शनीने जमलेल्या लोकांना सांगितले.
.. … …. …

फोटो-पारंगे चौकात एका व्यक्तीला मदत करणारे कार्यकर्ते . (छाया- अजित जगताप, सातारा)

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button