ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-फुकट चंभूना सातारा विश्रामगृहात आता नो एन्ट्री,,,,

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

फुकट चंभूना सातारा विश्रामगृहात आता नो एन्ट्री,,,,

सातारा दि: सब भूमी गोपाल की ,,,अशा पद्धतीने सातारा येथील सदर बाजार परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृहाचा वापर प्रत्येक समाजातील घटक व संघटना पत्रकार परिषद साठी करत होते. परंतु, सध्या विनाशुल्क फुकट चंभू ना सातारा येथील विश्राम गृहात नो एन्ट्री करण्यात आल्याचा सुखद धक्का आज साताऱ्यातील काही पत्रकारांना बसला. लवकरच नवीन सूचनेचा फलक लावण्यात येणार आहे.
याबाबत माहिती अशी की, शासकीय विश्रामगृहामध्ये माननीय अतिप्रमुख व्यक्ती तसेच लोकप्रतिनिधी व न्यायपालिकेत काम करणारे न्यायाधीश, शासकीय वरिष्ठ अधिकारी अशा व्यक्तींना अति महत्त्वाच्या कामासाठी शासकीय विश्रामगृहाचा वापर करता यावा. यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये शासकीय विश्राम गृह बांधणी करण्यात आलेली आहे. छत्रपतींची राजधानी असलेल्या सातारा शहरात १९६२ साली शासकीय विश्राम गृह बांधण्यात आले. त्याची चार वेळा डागडुजी करण्यात आली. आता त्याच्या शेजारीच असणाऱ्या मोकळ्या जागेत अति भव्य दिव्य असे शासकीय विश्रामगृह उभे राहत आहे. विशेष म्हणजे शासनातील वरिष्ठ मंत्री अजितदादा पवार यांच्या प्रयत्नातून हे शासकीय विश्राम गृह उभे राहत आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये शासकीय विश्रामगृहाचा वापर हा काही संघटनेचे पदाधिकारी हे कार्यालयासारखे करू लागले होते.
त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या लोकांना शासकीय विश्रामगृह म्हणजे धर्मशाळा वाटत होती. याचे प्रमाण एवढे वाढले की प्रत्येक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसाठी एक सूट आरक्षित केल्यासारखा झाला होता. या शासकीय विश्रामगृहामध्ये काही वेळेला शासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नातेवाईक किंवा राष्ट्रीय खेळासाठी साताऱ्यात आलेल्या खेळाडूंना हे विश्राम मिळत नव्हते. त्याऐवजी एखाद्या टुकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सुट दिला जात होता.
आता या बाबींवर अंकुश ठेवण्यासाठी सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फुकट चंबू यांना अंकुश घातलेला आहे. या ठिकाणी लेखी परवानगीशिवाय कोणत्याही व्यक्तीला अथवा संघटनेला पत्रकार परिषद घेता येणार नाही. या पत्रकार परिषदेचा निरोप देताना शासकीय विश्रामगृहात होणाऱ्या पत्रकार परिषदेची लेखी परवानगी असल्याशिवाय निरोप देऊ नये .अशी विनंती करण्यात आलेली आहे .
खरं म्हणजे आज एका व्यक्तिगत कामासाठी सातारा शासकीय विश्राम वेळात पत्रकार परिषद आयोजित केली होती. पण नवीन नियमाप्रमाणे ही पत्रकार परिषद घेण्यास शासकीय विश्रामगृहातील कर्मचाऱ्यांनी मज्जाव केला. या कर्मचाऱ्यांचे मनापासून पत्रकारांनी ही स्वागत केले. या नियमाचे पालन काटेकोरपणाने करण्यासाठी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी काही दिवसांसाठी या ठिकाणी एका पोलीस जवानाची नेमणूक करावी. जेणेकरून वादविवाद टाळता येतील असेही स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, या नवीन नियमावलीचे काही संघटनेने ही स्वागत केले आहे.
—————————————————————–

छाया—– सातारा शासकीय विश्राम गृहात पत्रकार परिषद रद्द झाल्यानंतर झालेली गर्दी (छाया- अजित जगताप सातारा)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button