आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पंढरपूर:-चाकोरीबाहेरील समाजाला चाकोरीत आणण्याचा पालवी ज्ञानमंदिरचा प्रयत्न.

पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष :-9503995968

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष

 पंढरपूर:-चाकोरीबाहेरील समाजाला चाकोरीत आणण्याचा पालवी ज्ञानमंदिरचा प्रयत्न.

भंगार वेचणाऱ्याच्या पाल्यांना पालवी ज्ञानमंदिर देते संस्कार स्पर्श.

खटाव-प्रतिनिधी

पंढरपुरातील पालवी ज्ञानमंदिरातील शिक्षक दिनानिमित्त विशेष बालकांना शिकवणाऱ्या शिक्षकांचा स्तुत्य उपक्रम जो समाज शिक्षणापासून वंचित राहत आहे.
अशा रस्त्यावरील राहणाऱ्या, भंगार वेचणाऱ्या, पारधी वस्तीतील विद्यार्थ्यांना आज शिक्षक दिनानिमित्त पालवीतील शिक्षकांनी दिले संस्कार धडे.
पालवीतील विशेष विद्यार्थ्यांनी शाळेत स्वयंप्रशासन राबवत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिक्षकांसमवेत आम्हीही वंचित घटकांना शिकवणार असल्याचा केला निर्धार.
चाकोरी बाहेरील समाजाला चाकोरीत आणण्यासाठी पालवी ज्ञानमंदिराच्या वतीने विशेष प्रयत्न सुरू झाले आहेत.
ही मुले का शिकत नाहीत याचा पूर्ण अभ्यास करून वर्षभरात शाळेत आणण्यासाठी आज शिक्षक दिनी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी घेतली शपथ.
यावेळी महिन्यातून दोन दिवस या वस्त्यांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना शिकवणार व सोबतच त्यांच्या पाल्यांचे विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी समुपदेशन करणार असल्याची माहिती शाळेतील मुख्याध्यापकांनी दिली.
विशेष बालकांना शिकवत असलेले शिक्षक हे मुळात संवेदनशील असल्याने वंचित घटकातील विद्यार्थी शाळेत येतील व सृजनशील नागरिक बनतील हा विश्वास प्रभा हिरा प्रतिष्ठानच्या संचालिका सौ.मंगलताई शहा यांनी व्यक्त केला.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button