वाई:-भारताचे लोकप्रिय आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा व सुशासन पंधरवड्यात गोमातेची सेवा या उपक्रमांतर्गत वाई शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने वेळे येथील करुणा मंदिर गोशाळेस गाईंसाठी खुराक व रोख रक्कम देऊन गोमातेची पूजा करून गोसेवा संपन्न.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
भारताचे लोकप्रिय आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज सेवा व सुशासन पंधरवड्यात गोमातेची सेवा या उपक्रमांतर्गत वाई शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने वेळे येथील करुणा मंदिर गोशाळेस गाईंसाठी काही खुराक व रोख रक्कम देऊन तसेच गोमातेची पूजा करून गोसेवा संपन्न केली. त्याप्रसंगी आदरणीय मोदी साहेब यांना उत्तम आरोग्य व उदंड आयुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली. देशी गायीचे भारतातील शेती करिता अनन्य साधारण महत्व,गाईपासून मिळणारे शेण व गोमूत्र याचा औषधीय उपयोग, तसेच देशी गायीचे दुधापासून मिळणाऱ्या विविध सकस पदार्थांमुळे देशी गाईचे पालन व्हावे, शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये देशी गोपालन आणि संवर्धन करावे या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमास वाई शहर अध्यक्ष विजयजी ढेकाणे, सरचिटणीस प्रशांत नागपूरकर ज्येष्ठ नेते काशिनाथजी शेलार, नगरसेविका रूपालीताई वनारसे, नगरसेविका वासंती ताई ढेकाणे, उपाध्यक्ष अमित वनारसे, विकास जाधव, सुनील साठे, डॉ. मकरंद पोरे, कामगार मोर्चा जिल्हा अध्यक्ष तेजस दादा जमदाडे तसेच श्रीकांतजी कुंभार, सुधीर भागवत, रमेश दादा जमदाडे, हेमंत भोरे,अथर्व पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष गणेश जायगुडे, सिद्धेश महांगडे, सुमितकुमार शिंदे, केदार राजपूत,अतुल शेठ वाईकर,किरण जाधव, अपर्णा ताई वाईकर, शुभदा नागपूरकर,सारिका गवते, भारती मांढरे, भावना चौगुले व कार्यकर्ते उपस्थित होते.




