श्रीरामपूर:-शेती महामंडळाची जमीन वर्ग – १ करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता – ना . राधाकृष्ण विखे पाटील
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
शेती महामंडळाची जमीन वर्ग – १ करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता – ना . राधाकृष्ण विखे पाटील
श्रीरामपुर ( Rps स्टार न्युज ) महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची जमीन वर्ग -२ मधुन – १ करण्यास . तसेच सार्वजनिक प्रयोजनार्थ वापरण्यास मंत्रीमंडळाची मान्यता मिळाल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली .
महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची जमीन वर्ग करण्याच्या या सुधारणेमुळे ६ जिल्ह्यांतील १० तालुक्यामधे वाटप करण्यात आलेल्या 3 ८ हजार 3 61 एकर क्षेत्राचा धारणा प्रकार भोगवटादार वर्ग -१ असा होणार असुन सुमारे २ हजार ६० ० खंडकरी शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे . या सुधारणेमुळे दिर्घ कालावधीपासुनची खंडकरी शेतकऱ्यांची मागणी पुर्णत्वास जाऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे
महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या ताब्यातील जमिनी खंडकरी शेतकरी व त्यांच्या वारसांना भोगवटादार वर्ग – 2 या धारणाधिकारने वाटप करण्यात आलेल्या होत्या . ज्या खेडकरी शेतकर्यांनी वर्ग १ च्या जमिनी खंडाने दिलेल्या होत्या . ज्या खंडकरी शेतकऱ्यांनी वर्ग – १ च्या जमिनी खंडाने दिलेल्या होत्या त्या परत मिळतांना त्यांना वर्ग – 2 म्हणून मिळाल्याने या जमिनींचा धारणा प्रकार वर्ग १ करून मिळणबाबत सकारत्मक विचार करून मंत्रीमंडळ बैठकीत मांडलेल्या प्रस्तावास राज्य
तसेच शेती महामंळाची जमीन मिळणेबाबत वेगवगळ्या सार्वजनिक प्रयोजनांसाठी ग्रामपंचायतींकडुन मागणी करण्यात येत होती . परंतु सिलींग कायद्यातील तरतुदीनुसार नगरपालिका हद्दीपासुन ५ कि . मी अंतराबाहेरील जमिनी सार्वजानिक प्रयोजनासाठी देता येत नसल्याने या जमिनी ग्रामपंचायतींना देण्यास कायदेशीर अडचण निर्माण झालेली होती . शासकीय घरकुल योजना . गावठाण विस्तार योजना . घनकलरा व्यावस्थापन पाणी पुरवठा योजना या कारणांसाठी ग्रामपंचायतींची गरज विचारात घेऊन सिलींग कायद्यास सुधारणा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे . या सुधारणेनुसार आता ग्रामपंचायतींच्या मागणीनुसार सार्वजनिक प्रयोजनासाठी शेती महामंडळाची जमीन उपलब्ध करून देता येईल.