आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

फलटण:-वाचन चळवळ आणि झाडांची हिरवळ सर्वांनी जोपासली पाहिजे श्रीमंत संजीवराजे ना निंबाळकर फलटण येथे आई सन्मान पुरस्कारांचे वितरण.

संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

वाचन चळवळ आणि झाडांची हिरवळ सर्वांनी जोपासली पाहिजे श्रीमंत संजीवराजे ना निंबाळकर
फलटण येथे आई सन्मान पुरस्कारांचे वितरण.

आपण सर्वांनी वाचन चळवळ व झाडांची हिरवळ जोपासली पाहिजे आई प्रतिष्ठान चा मंत्र सर्वांनी आत्मसात करावा आज विद्यार्थ्यांना मोबाईल पेक्षा अभ्यास, खेळ याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सातारा जिल्हा हा गुणवत्तेच्या बाबतीत महाराष्ट्रात नेहमीच आघाडीवर असलेला आपण पाहिला आहे. असे मत श्रीमंत संजीवराजे यांनी आई सन्मान पुरस्कारांच्या वितरण प्रसंगी वाठार निंबाळकर ता फलटण येथील कार्यक्रमात व्यक्त केले त्यांनी आई प्रतिष्ठानच्या विविध उपक्रमाचे कौतुक केले. त्याचबरोबर नेहमी चांगल्या कार्यात सहकार्य राहील असेही सांगितले. गणेश तांबे गुरूजी हे सामाजिक उपक्रमाबरोबर शाळेचे कार्यही अतिशय उत्कृष्ट करतात. असेही सांगितले
सन २०१७ पासून आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकर हे विविध सामाजिक उपक्रम राबवत असते.यातीलच एक अत्यंत स्तुत्य असा उपक्रम म्हणजे आई सन्मान पुरस्कार. सातारा जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना आई प्रतिष्ठान कडून आई सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. याही वर्षी सातारा जिल्ह्यातील गुणवंतांना सन्मान श्रीमंत संजीवराजे बाबा यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
यामध्ये .शक्ती उर्फ अशोक मनोज भोसले, अतुल जगन्नाथ कुंभार, अक्षदा आबासाहेब ढेकळे, कोमल ज्ञानेश्वर जाधव,चित्रा मोहन इंदापुरे, वसंत कृष्णा शेडगे, बिरा आप्पा लोखंडे, किरण श्रावण अहिवळे , विजयकुमार किसन भुजबळ, रूपाली रामदास जाधव, सुजाता बाळासाहेब सोळसकर, राजेंद्र तात्याबा गोफणे, दत्तात्रय सोमनाथ भोसले, विनायक आप्पासाहेब चव्हाण, सीमा सुरेश पार्टे,.सुरेखा शिवाजीराव निंबाळकर, कृष्णात बरीकराव कुंभार, दत्तात्रय किसन पवार, कांचन अमोल चवरे, सचिन जगन्नाथ धुमाळ, अनुराधा रमेशराव कदम, सचिन कालिदास पंडित नवनाथ चंद्रकांत कोळपे, उज्वला सुरेश नाळे ,निलेश हिम्मतराव निंबाळकर, निलम अर्जुन रुपनवर, सुनील विजय तिवाटणे, सागर बाळासाहेब लोंढे, .यशवंत रमेश जगताप गणेश अशोक शिंदे इत्यादी गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.
त्याच बरोबर राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार धन्यकुमार तारळकर, शुभांगी कुंभार यांचा ही सत्कार करण्यात आला. या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती सद्गुरु हरिबुवा पतसंस्थेचे चेअरमन . तेजसिंह भोसले दत्ता बापू अनपट , सचिन रणवरे शोभाताई नाईक निंबाळकर, सुवर्णाताई नाळे ,अशोकराव निंबाळकर, नेताजी निंबाळकर, संतोष कारंडे नंदूभाऊ नाळे ,संजय शिंदे ,शिक्षक बँकेचे चेअरमन राजेंद्र बोराटे इत्यादी मान्यवर उपस्थित प्रास्तविक गणेश तांबे यांनी केले नवनाथ कोलवडकर यांनी सूत्रसंचालन केले

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button