सिंधुदुर्ग:-कुडाळ:-(तिटा)-महामार्ग प्राधिकरणाच्या कनिष्ठ अभियंत्याला मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी उबाठा शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक (रा. कणकवली) यांच्यावर कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
पत्रकार शैलेश मेस्त्री सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
1)कुडाळ:-(तिटा)-महामार्ग प्राधिकरणाच्या कनिष्ठ अभियंत्याला मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी उबाठा शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक (रा. कणकवली) यांच्यावर कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

कुडाळ : मुंबई – गोवा महामार्गावर झाराप – तिठा येथे मंगळवारी झालेल्या दुचाकी आणि कार अपघातानंतर ग्रामस्थानी महामार्ग रोखून धरल्याने तेथे आलेल्या महामार्ग प्राधिकरणाच्या कनिष्ठ अभियंत्याला मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी उबाठा शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक (रा. कणकवली) यांच्यावर कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत महामार्गाचे कनिष्ठ अभियंता (राष्ट्रीय महामार्ग उपविभाग, सावंतवाडी) मुकेश राकेश साळुंके (33, रा.सध्या रा. पिंगुळी – आनंदवन, मूळ रा. धुळे ) यांनी पोलिसात दिली.
मंगळवारी दुपारी महामार्गावर झाराप – तिठा येथे कार व दुचाकी यांच्यामध्ये भीषण अपघात झाला.यात दुचाकीवरील शाळकरी विद्यार्थी लवू उर्फ राज पेडणेकर (15, रा.साळगाव – नाईकवाडी) याचा जागीच मृत्यू झाला.या अपघातानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांच्या जमावाने महामार्ग रोखून धरला होता. तेथील मिडलकट कायमस्वरूपी तात्काळ बंद करावा. महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकारी घटनास्थळी येत नाही तोपर्यंत महामार्गावरून हटणार नाही अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतली.
2)जि.प.पं.स. निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक
सिंधुदुर्गनगरी : राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनांच्या अनुषंगाने जिल्ह्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीस पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, निवासीउपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय व पोलीस निरीक्षक हे दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.
बैठकीत उपजिल्हा निवडणूक अधिकारी शेवाळे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रभाग रचना, प्रस्तावित मतदान केंद्रांची संख्या, मतदारसंख्या आणि संबंधित संक्षिप्त माहिती दिली. तसेच जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणा आगामी निवडणुका पारदर्शक, शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी अधिकारी (महसूल व गृह), तहसिलदार सज्ज असल्याचेही त्यांनी बैठकीत सांगितले.




