ताज्या घडामोडी

सातारा:-प्राथमिक शिक्षक बँकेने अधिक प्रगती करावी- शरदचंद्र पवार साहेब.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS

प्राथमिक शिक्षक बँकेने अधिक प्रगती करावी- शरदचंद्र पवार साहेब.

सातारा : राज्यातील पाचशे पेक्षा जास्त सहकारी बॅंका बंद झाल्या अशा अवघड परिस्थितीत सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेने उत्तम कामगिरी केलेली आहे. त्यांच्या शतकी महोत्सवी वर्षानिमित्त त्यांना शुभेच्छा देऊन त्यांनी अधिक प्रगती करावी असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व सहकारातील महामेरू आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांनी सातारा येथे केले. प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त स्वर्ग यशवंतराव चव्हाण सभागृह सातारा या ठिकाणी झालेल्या या कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना श्री पवार साहेब बोलत होते.
यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील आमदार शशिकांत शिंदे आमदार दीपक चव्हाण, शिक्षक आमदार जयंत आसगावकर, समिती जिल्हाध्यक्ष विश्वंभर रणनवरे, दीपक भुजबळ, यांच्यासह शिक्षक बँकेचे चेअरमन किरण यादव, व्हाईस चेअरमन शहाजी खाडे, तसेच सर्व संचालक शिक्षक संघटनेचे नेते संभाजीराव थोरात, उदय शिंदे , जिल्हा सहकार उपनिबंधक संजय कुमार सुंद्रिक,बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी छगन खाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय पवार, राजेश कदम, प्रदीप कांबळे यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी विश्वास संपादन करून या सोहळ्यामध्ये विक्रमी उपस्थिती दाखवल्याबद्दल अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणात त्याचे कौतुक केले. विशेष बाब म्हणजे जिल्हा बँकेच्या अमृत महोत्सवी व सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमानिमित्त शरदचंद्र पवार साहेब उपस्थित राहिले . हा उल्लेख अनेक मान्यवरांनी केला.

केंद्रामध्ये सहकार खात्याची निर्मिती झाल्यानंतर अनेक सहकारी बँकांवर रिझर्व्ह बॅंकेकडून जाचक अटी व निर्बंध घालण्यात आले. सहकाराची अर्थवाहिनी संपून टाकण्याचा डाव होत आहे यावर आवाज उठवणे गरजेचे आहे. असे ही श्री पवारसाहेब यांनी स्पष्ट केले.
खा. धैर्यशील मोहिते – पाटील म्हणाले, प्राथमिक शिक्षकांना फक्त शिक्षण देण्याचे काम सरकारने केले तर खऱ्या अर्थाने गुणवत्ता व पट वाढणार आहे. त्यामुळे आता शिक्षकांनी सुद्धा इतर कामे करण्यापेक्षा गुणवत्तेवर लक्ष देऊन यश संपादन करावे. त्यांच्या पाठीशी ठाम आहोत. असाही दिलासा दिला. आ. बाळासाहेब पाटील म्हणाले, प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी खा. शरद पवार यांनी नेहमीच प्रयत्न केले आहेत.
आ. शशिकांत शिंदे म्हणाले, देशाचे नेते शरद पवार यांनी शिक्षकांच्या प्रश्नांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचे काम केले आहे आता प्राथमिक शिक्षकांनी आमच्या सोबत यावे असे त्यांनी आवाहन केले. संभाजीराव थोरात यांनी आपल्या रांगडे भाषेत शिक्षकांचे महत्त्व ग्रामीण भागात आजही कायम आहे शिक्षकांनी जर साथ दिली तर निश्चित यश मिळते पण शाप दिला तर त्याला पुन्हा उषा देण्याची पद्धत नाही असे सांगितल्यामुळे सभागृहात एकच हशा पिकला.श्री पवार साहेब दिल्लीत तुमच्या शब्दाला वजन असून याप्रश्नी आपण आवाज उठवावा. अशी ही जोरदार मागणी केली

यावेळी शिक्षक समितीचे राज्य अध्यक्ष उदय शिंदे, आ. जयंत आसगावकर यांनी मनोगत व्यक्त केले.किरण यादव म्हणाले, प्राथमिक शिक्षक बँक बँकेने शंभर वर्ष पूर्ण केल्याने खऱ्या अर्थाने आर्थिक सहकार्य सुद्धा अनेकांना झालेले आहे. हे सहकार्य कायमस्वरूपी सुरूच राहणार आहे. यावेळी प्राथमिक शिक्षक बँकेच्या उभारणीसाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलेले आहे त्यांचे स्मरण करण्यात आले.
या कार्यक्रमानिमित्त बँकेच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या ‘शतार्थ’या स्मरणिकेचे प्रकाशन, एटीएम कार्ड, डीजीटल बॅंकिंग युपीआय कार्डचे वितरण, अकरा ज्येष्ठ सभासद व बॅंकेच्या सर्व माजी चेअरमन, व्हा. चेअरमन यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. उपशिक्षणाधिकारी रविंद्र खंदारे लिखित प्रभातरंग या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. बॅंकेचे संस्थापक कृ. बा. बाबर यांचे नातू यशवर्धन पवार (चितळी) यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी समितीचे नेते शंकर देवरे, बॅंकेचे संचालक ज्ञानबा ढापरे,नितीन काळे, पुष्पलता बोबडे,निशा मुळीक, महेंद्र जानुगडे,विशाल कणसे, नितीन राजे, तानाजी कुंभार, विजय शिर्के, संजय संकपाळ, नितीन फरांदे, विजय ढमाळ, शशिकांत सोनवलकर, राजेंद्र बोराटे, नितीन शिर्के, सुरेश पवार, नवनाथ जाधव, संजीवन जगदाळे, विजय बनसोडे या संचालकासह अनेक आजी-माजी सभासद उपस्थित होते. विविध क्षेत्रातील मान्यवर, बॅंकेचे सभासद, हितचिंतक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. बॅंकेचे माजी चेअरमन विठ्ठल माने यांनी सूत्रसंचालन केले. व्हा. चेअरमन शहाजी खाडे यांनी आभार मानले. दरम्यान या कार्यक्रमानिमित्त शिक्षिका महिला सभासदांची संख्या कमी असल्याने ती वाढवण्यासाठी प्रयत्न करावा. अशी सूचना श्री पवार साहेब यांनी केली
———————–&——————-
चौकट– प्राथमिक शिक्षक बँकेच्या शतक महोत्सवी सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या भोजनाचा लाभ सर्व सभासद यांच्यासोबतच बँकेचे चेअरमन व्हाईस चेअरमन व संचालकांनी घेतला.

चौकट —-ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेब हे सभागृहातून बाहेर पडल्यानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे उपस्थित झाले होते तर निमंत्रण पत्रिकेत नाव टाकून सुद्धा श्री पवार साहेब प्रमुख पाहुणे असल्यामुळे अनेक जणांनी राजकीय भीतीपोटी त्यांच्यासमोर उपस्थिती दाखवली नाही. अशी चर्चा सभागृहाबाहेर चांगलीच रंगली आहे.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button