सातारा:-वंचितच्या साताऱ्यातील आंदोलनानंतर सतरंजी उचलण्याची आली जिल्हाध्यक्षवर वेळ.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
वंचितच्या साताऱ्यातील आंदोलनानंतर सतरंजी उचलण्याची आली जिल्हाध्यक्षवर वेळ.
सातारा दि: राजकारणामध्ये सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला मोठे व्हायचे असेल तर पडेल ते काम करावे लागते. याची सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुणूक दाखवून देण्यात आली. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई यांनी स्वता सतरंजी अंथरली व आंदोलन संपल्यानंतर तीच सतरंजी उचलण्याची ही जबाबदारी पार पाडली.
आज मंगळवार दि:२९ रोजी दुपारी बारा वाजता सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भर उन्हात वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्ह्याच्या वतीने अहमदनगर व सातारा जिल्ह्यातील दलित अत्याचाराच्या घटनेचा निषेध करून आंदोलन करण्यात आले होते .या आंदोलनात मध्ये सातारा जिल्ह्यातून आलेल्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. तसेच अहमदनगर घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करावी. अनुसूचित जाती जमाती ग्रस्त अहमदनगर जिल्हा जाहीर करावा. फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला सुरू करावा. आरोपीची संपत्ती जप्त करावी. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील म्हसवड या ठिकाणी मातंग महिलेवर झालेल्या रस्त्यातील मारहाणी बाबत तसेच किकली तालुका वाई येथे घडलेल्या घटनेबाबत आरोपींना जास्तीत जास्त कडक शिक्षा करावी. या मागणीसाठी हे आंदोलन घेण्यात आले होते.
या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई, युवा उपाध्यक्ष अमोल गंगावणे, विजय वानखेडे यांच्या सह ७० ते १०० कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यकर्त्यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन लेखी निवेदन दिले. फोटो सेशन केले.तसेच कार्यकर्त्यांना चहापान केले परंतु, ज्या ठिकाणी आंदोलन झाले होते. त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना बसण्यासाठी ठेवण्यात आलेल्या बॅनर वजा ताडपत्री उचलण्यास सुरुवातीला कोणी ही पुढे आले नाही.हा बॅनर पुन्हा उपयोगी पडेल. या दृष्टीने स्वतः वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई व सातारा शहर उपाध्यक्ष अमोल गंगावणे त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे विजय वानखेडे यांना सतरंजी उचलावी लागली.
खरं म्हणजे प्रत्येक संघटना व राजकीय पक्षांमध्ये नेत्याला खूप मोठा मान असतो. पांढऱ्या पोशाखात नेते व कार्यकर्ते येऊन सभा गाजवून जातात. पण त्यानंतर सामान्य कार्यकर्त्याला आंदोलनासाठी आणलेले साहित्य परत द्यावे लागते. खुर्ची आणण्यासाठी तसेच कार्यक्रम झाल्यानंतर ती उचलावी लागते. हे फक्त डाव्या चळवळीत दिसते. अशी चर्चा रंगू लागली आहे.
पण, आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी या पक्षातील सातारा जिल्हाध्यक्ष यांना आंदोलनानंतर सतरंजी उचलावी लागते. हे पाहून अनेकांना कार्यकर्ता कसा असावा ? याची चुणूक पाहण्यास मिळाली. सध्या वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई हे अनुभवी कार्यकर्ते असून त्यांना सतरंजी उचलताना कुठलाही कमीपणा वाटत नाही. शेवटी पक्षाच्या ध्येय धोरणानुसार वाटचाल करत असताना पांढरी कपडे परिधान करून भाषण करण्यापेक्षा सर्वसामान्य कार्यकर्त्यांसारखे वागण्यातच खरं मोठेपण आहे. हे मात्र अनेकांच्या चांगलेच लक्षात आणून देण्यात आले. दलित ,पद दलित व कष्टकरी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी या गोष्टीबद्दल वंचितचे सातारा जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई, अमोल गंगावणे व विजय वानखेडे यांचे मनापासून कौतुक केले आहे.
—————————————————–
फोटो- सातारा जिल्हाधिकारी कार्यालय आंदोलनानंतर सतरंजी उचलताना जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी (छाया- अजित जगताप,सातारा)