आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राहाता तालुक्यातील कनकुरी या गावात दिल्ली येथील साई भक्त अनिल गुप्ता यांनी मराठी शाळेत केली शालेय साहित्य वाटप…ग्रामस्थां कडून सत्कार..

पत्रकार वसंत काळे अहमदनगर जिल्हा सचिव:-9767653309

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
 पत्रकार वसंत काळे अहमदनगर जिल्हा सचिव

कनकुरी येथे जिल्हा प्राथमिक शाळा गरजू विद्यार्थ्यांना साईभक्त अनिल जी गुप्ता साहेब यांच्याकडून स्कूल बॅग वितरण करण्यात आले. त्यावेळेस श्री जयवंत डांगे यांनी मनोगत व्यक्त केले. गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळाल्यामुळे त्यांच्या शालेय शिक्षण व पुढील वाटचालीसाठी मदत होते. अपुऱ्या सुविधामुळे मुलांचे पुढील शिक्षणस अडचणी निर्माण होतात. हे लक्षात घेऊन आपण कनकूरी जिल्हा परिषद शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी समाजाचे विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरण करून आपण साईबाबांचा संदेश समाजाला दिला. मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून श्री.गुप्ता साहेबांना आनंद वाटला. श्री गुप्ता साहेब यांनी थंडीमध्ये स्वेटर देनार असल्याचे कबूल केले. गेल्या तीन ते चार वर्षापासून श्री गुप्ता गरजू विद्यार्थ्यांसाठी वेळोवेळी शालेय साहित्य देत आहेत त्यांचे मनापासून आभार व्यक्त करण्यात आले व असेच गरजू विद्यार्थ्यांना आपण वेळोवेळी मदत करावी अशी ग्रामस्थांच्यावतीने विनंती करण्यात आली प्रामुख्याने ग्रामस्थांच्या वतीने मा.सरपंच श्री.बाबासाहेब डांगे श्री. उत्तम कालेकर श्री भागवतराव डांगे श्री माधव डांगे श्री भाऊसाहेब डांगे पोलीस पाटील कनकुरी श्री विजय डांगे पाटील, शिवाजी डांगे,श्री राकेश भोकरे , श्री अनिल नळे,भाऊसाहेब वाघ व शाळेच्या वतीने ही त्यांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी शिक्षक वर्ग मुख्याध्यापक पठाडे मॅडम श्री वायाळ सर श्री.सोनवणे सर यांनी सर्वांचे आभार मानले. इतर ग्रामस्थ उपस्थित होते.(हा कार्यक्रम आटोपल्यानंतर प्रहारचे अभिजित कालेकर यांनी श्री.अनिल गुप्ता यांना विनंती केली कि आपण राहाता तालुक्यातील इतर गावातील अनेक शाळेत गरीब विद्यार्थी आहेत कि ज्यांना साहित्याची अत्यंत गरज आहे.त्यांनाही आपल्या मार्फत सहकार्य करावे .त्यांनी शब्द दिला कि भविष्यात नक्की मि आणखी जास्तीत जास्त विद्यार्थ्याना मदत करण्याचा नक्की प्रयत्न करेल)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button