फलटण:-गोकुळ अष्टमीनिमित्त फलटणला कार्यक्रम.
संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208718483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
गोकुळ अष्टमीनिमित्त फलटणला कार्यक्रम.
मलटण
महानुभाव पंथाची दक्षिण काशी संबोधण्यात येत असलेल्या फलटण येथे श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून अखिल भारतीय महानुभाव परिषद अध्यक्ष आचार्य श्यामसुंदर विद्वांस यांच्या मार्गदर्शनाखाली येथील श्रीकृष्ण मंदिरात गोकुळ अष्टमी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून या कार्यक्रम, उपक्रमांमध्ये सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
बुधवारी दि. ६ सप्टेंबर रात्री १२ वाजता शासकीय अधिकारी आणि राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. श्रीकृष्ण मंदिरात विश्वस्त सुदामराज यांच्या हस्ते विडा अवसर करुन, सभा मंडपामध्ये विणा पूजन विश्वस्त बाळासाहेब ननावरे, माजी उपसभापती विवेक शिंदे, माजी सरपंच रामदास शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी श्रीकृष्ण उद्योग समूहाकडून सर्व विणेकरी यांना टीशर्टचे वाटप सुदामराज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्रीकृष्ण देवस्थानचे ट्रस्टी सर्वश्री अर्जुनराव नाळे, बाळासाहेब ननावरे, बाळासाहेब शिंदे, माजी उपसभापती विवेक शिंदे, माजी सरपंच रामदास शिंदे, गोटू बुवाजी, संजय किसन शिंदे आदी उपस्थित होते.