सातारा:-असेल विकासक सभासद क्रेडाई….. कुठेही फसवणुकीची भीती नाही, संघटनेची माहिती
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
असेल विकासक सभासद क्रेडाई….. कुठेही फसवणुकीची भीती नाही, संघटनेची माहिती
सातारा दि: महाराष्ट्र क्रेडाई अंतर्गत ए टू झेड रेरा कार्यशाळा अंतर्गत आज क्रेडाई ,सातारा यांच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी संघटनेच्या वतीने अनेक प्रश्न शासकीय स्तरावर मार्गी लावण्यात यश आलेले आहे. त्यामुळे आता असेल विकासक क्रेडाईचे सभासद , सदनिका खरेदीदारांना फसवणुकीची भीती नाही. हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
सध्या सातारा जिल्ह्यासह कराड, इस्लामपूर, सांगली, कोल्हापूर, बारामती, जयसिंगपूर, इचलकरंजी, फलटण या परिसरात मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण प्रकल्प यशस्वी झाले आहेत .काही प्रगती पथावर आहेत. यामध्ये स्पष्टता व पारदर्शकता यावी. यासाठी या संघटनेने साताऱ्यात कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्याची ही सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली. तसेच पत्रकारांच्या विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तर देऊन अनेकांच्या मनातील शंका दूर केली.
महाराष्ट्राचा विचार केला तर क्रेडाई संघटना राज्यांमध्ये पंचवीस वर्षापासून काम करत आहे .सातारा येथे साठ तर राज्यात 3500 सभासद आहेत. घरबांधणी व विकास कामांसाठी लक्ष ठेवून क्लीन व ग्रीन सिटी या माध्यमातून पर्यावरणाची काळजी घेतली जात आहे. रेरा नोंदणी झालेल्या व्यवसायिक विकासकांनी दर तीन महिन्याला कशा पद्धतीने काम केले ? याची माहिती ऑनलाइन भरली जाते. सध्या व याला इंडस्ट्रीचा दर्जा मिळाला असून रोजगार उपलब्ध झालेले आहे. शहरांमध्ये मोठे काम सुरू असून आता प्युअर कोड घेण्यात आला आहे . केंद्र व राज्य सरकारच्या सुचने प्रमाणे कामकाज होत आहे. अशी माहिती देण्यात आली. या पत्रकार परिषदेला क्रेडाई संघटनेचे पदाधिकारी प्रमोद खैरनार पाटील, विद्यानंद बेडेकर,सुनील कोतवाल, रवींद्र खिलारे पवार महाराष्ट्र रेरा कमिटी सदस्य उदय काशीलवाल संभाजीनगर आदित्य बेंद्रे कर कोल्हापूर दिलीप पाटील सांगली अभिनव साळुंखे सोलापूर सौ नेहा खापरे सांगली बाळासाहेब शिरकांडे सचिन अगा ने ,फडके व बाळासाहेब ठक्कर, सुधीर शिंदे, ऐश्वर्या शिरकांडे, ज्योती ठ क्कर, अर्चना शिंदे, स्वाती पाटील, वैशाली वाडेकर, श्वेता राजेमहाडिक,माजीद कच्छी ,साहिल प्रभाळे अनुप पोरे राजेश माने मंगेश वाडेकर राजेश माने साहिल सय्यद उपस्थित होते.
————————————————————
क्रेडाई संघटनेचे पदाधिकारी पत्रकार परिषदेत माहिती देताना,,, (छाया- अजित जगताप, सातारा)