पुणे –(वारजे) परिसरातील प्रलंबित डीपी रस्त्याबाबत चर्चा.
पत्रकार विजय देवकुळे हवेली तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
पुणे –(वारजे) परिसरातील प्रलंबित डीपी रस्त्याबाबत चर्चा.

वारजे : वारजे येथील डुक्कर खिंड ते तिरुपतिनगर दरम्यान वन विभागाच्या हरकतीमुळे प्रलंबित असलेल्या डीपी रस्त्याची समस्या सोडवण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे, पुणे मनपा आयुक्त श्री. नवल किशोर राम आणि सचिन भाऊ दोडके यांनी पाहणी केली.
स्थानिक नागरिकांच्या तक्रारी व अडचणी ऐकून घेतल्यानंतर रस्त्याच्या कामाची माहिती अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली. रस्ता लवकरात लवकर सुरू व्हावा यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन या वेळी देण्यात आले.
या संपूर्ण प्रश्नावर सातत्याने लक्ष ठेवून पाठपुरावा करणारे सचिन भाऊ दोडके यांचे स्थानिक नागरिकांकडून विशेष कौतुक होत आहे. त्यांनी नेहमीच या रस्त्याच्या कामाबाबत मनापासून प्रयत्न करून नागरिकांची बाजू मांडली आहे.
या पाहणीत सचिन भाऊ दोडके यांच्यासह स्थानिक मान्यवर, पोलीस अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.




