कोरेगाव:-( वाठार स्टेशन ):-छञपती संभाजी महाराज पतसंस्थेत गत सहा महिन्यात व्यवसाय वाढ …..
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
छञपती संभाजी महाराज पतसंस्थेत गत सहा महिन्यात व्यवसाय वाढ …..
वाठार स्टेशन दि: कोरेगाव तालुक्यातील बाजारपेठेचे गाव असलेल्या पिंपोडे बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेने गट सहा महिन्यात ८६ कोटी ६५ लाख रुपयाची व्यावसायिक वाढ केली आहे. भविष्यात या पतसंस्थेचा विस्तार सहकारी बँकेत करण्याचा मानस व्यक्त केला जात आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने स्थापन झालेल्या या सहकारी पतसंस्थेने पारदर्शक कार्य करून सहकार क्षेत्रात एक आदर्श निर्माण केला . पतसंस्थेचे संस्थापक रामभाऊ लेंभे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संचालक, ठेवीदार, कर्जदार व सेवक- अधिकारी यांच्या अथक प्रयत्नातून हे यश संपादन केलेल्या आहे.पश्चिम महाराष्ट्रात ५५ शाखाविस्तारझाला आहे. पतसंस्थेच्या २५ शाखा स्वमालकीच्या इमारतीमध्ये कार्यरत आहेत. असलेल्या पिंपोडे बुद्रुक ता.कोरेगाव येथील छञपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेने १२५१ कोटी ६९ लाख संमिश्र व्यवसाय करून दाखवला आहे.
दरवर्षी मार्च महिन्यानंतर सहकार क्षेत्रात थोडा मंदीचा काळ येतो, कामकाजात शिथिलता येते.बँकिंग क्षेत्रात हा पहिला टप्पा कर्ज वाटपात जातो.दसरा दिवाळीनंतर ठेवींना काळ चांगला येत व्यवसाय वाढ होते.माञ ग्राहकांचे विश्वासास पाञ राहून कारभार होत आहे.
मार्च २०२४ अखेर संस्थेकडे ठेवी ६६१ कोटी २९ लाख होत्या..सभासद संख्येत १२२१ नी वाढ होऊन ७३,९२४ सभासद संख्या झाली आहे.खेळते भांडवलात ४८ कोटी ६५ लाख वाढ होऊन ७९० कोटी ६५ लाखांचे खेळते भांडवल झाले आहे.गुंतवणूकीत ७ कोटी ५८ लाखाची वाढ होऊन १९७ कोटी ०२ लाख बॅंक गुंतवणूक झालेली आहे. पुणे जिल्ह्यातील वेल्हे येथे लवकरच नवीन शाखेचा शुभारंभ होणार असून अनेक संस्था मुंबईतून ग्रामीण भागात आल्या,माञ ग्रामीण भागातून शहरांकडे जाणारी छञपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्था ही एकमेव पतसंस्था आहे . संस्थेचे प्रशासन विभाग अधिकारी अशोक रावसाहेब लेंभे यांच्यासह अनेक अधिकारी वर्ग प्रामाणिकपणे सेवा देत असल्याने पतसंस्थेच्या ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे. महात्मा गांधींनी सांगितले होते की शहराकडे चला त्याच धर्तीवर आता ग्रामीण भागातील पतसंस्था शहराकडे वाटचाल करत असून भविष्यात महाराष्ट्राच्या बाहेरही छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेचे कामकाज होईल असा जेष्ठ पत्रकार दिगंबर नाचण व शैलेश धुमाळ यांच्यासह अनेक पत्रकारांनी आपुलकीने विश्वास यावेळी व्यक्त केला.
————————————————–
छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेचे संस्थापक रामभाऊ लेंभे