पुणे:-कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर राज्यांनी देखरेख यंत्रणा मजबूत करा: डॉ. मनसुख मांडविया.
प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर राज्यांनी देखरेख
यंत्रणा मजबूत करा: डॉ. मनसुख मांडविया.
पुणे, दि. 24 (शफिक शेख):- “केंद्र आणि राज्यांनी कोविड19 प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी आधीप्रमाणे एकत्रितपणे आणि सहयोगी भावनेने काम करणे आवश्यक आहे”, असे आवाहन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आज केले. राज्यांचे आरोग्य मंत्री, प्रधान सचिव/अतिरिक्त मुख्य सचिव आणि माहिती आयुक्त यांच्याशी संवाद साधताना ते बोलत होते. चीन, जपान, ब्राझील आणि अमेरिका यांसारख्या काही देशांमध्ये अलीकडेच वाढलेल्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कोविड-19 चे नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी सार्वजनिक आरोग्य सज्जता आणि राष्ट्रीय कोविड-19 लसीकरण मोहीम प्रगतीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक घेण्यात आली.
काल झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत पंतप्रधानांनी राज्यांना दिलेला सतर्क राहण्याचा आणि कोविड19च्या व्यवस्थापनासाठी सर्व तयारी ठेवण्याचा दिलेल्या सल्ल्याचा संदर्भ मांडवीय यांनी दिला. राज्यांना खबरदारीचा आणि सक्रिय दृष्टीकोन ठेवण्याची विनंती त्यांनी केली. देशात एखाद्या नवीन व्हेरियंटचा शिरकाव झाला तर त्याबाबत वेळीच कळावे यासाठी भारतीय SARS-CoV-2 Genomics Consortium (INSACOG) नेटवर्कद्वारे पॉझिटिव्ह रूग्णांच्या नमुन्यांचा संपूर्ण जीनोम अनुक्रमासाठी देखरेख प्रणाली बळकट करण्याचे त्यांनी राज्यांना आवाहन केले.
कोविड व्हेरियंट नवा असला तरी कोविड व्यवस्थापनासाठी चाचणी-माग -उपचार-लसीकरण आणि कोविड प्रतिबंधासाठी आवश्यक योग्य वर्तनाचे पालन करणे ही कसोटीवर उतरलेली रणनीती कायम ठेवणार असल्याचे डॉ. मांडवीया यांनी सांगितले. 22 डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या आठवड्यात प्रति दशलक्ष 79 इतक्या कोविड चाचण्यांच्या सध्याच्या दरावरून, चाचण्यांचा दर त्वरेने वाढवण्याची विनंती राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना करण्यात आली. या चाचण्यांमध्ये आरटी- पीसीआर(RT-PCR) चाचण्यांची संख्या वाढवण्याचा सल्लाही देण्यात आला होता.
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना सर्व पात्र लोकसंख्येचे, विशेषत: वृद्ध आणि असुरक्षित लोकसंख्येचे लसीकरण वाढवण्याचा सल्ला दिला. वस्तुस्थितीनुसार योग्य माहितीचा प्रसार सुनिश्चित करून, चुकीची माहिती पसरू नये यासाठी दक्ष राहण्यास सांगितले. आगामी सणासुदीच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर, त्यांनी कोविड प्रतिबंधासाठी सुयोग्य वर्तनाचे पालन करण्याबाबत जनजागृती करण्याच्या मोहिमांवर भर दिला. काही राज्यांनी 27 डिसेंबर 2022 रोजी रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांच्या तयारीसाठी दक्षतेची तालीम (मॉक ड्रिल) आयोजित करण्याचे आश्वासनही दिले.
या बैठकीला डॉ. मनोहर अग्नानी, अतिरिक्त सचिव (आरोग्य मंत्रालय), लव अग्रवाल, अतिरिक्त सचिव (आरोग्य मंत्रालय), मनदीप भंडारी, संयुक्त सचिव (आरोग्य मंत्रालय), डॉ. अतुल गोयल, डीजीएचएस आणि मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी हे देखील उपस्थित होते.