पुणे पिंपरी:-शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक अगळावेगळा सन्मान सोहळा संपन्न.
प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-8208717483

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त
एक अगळावेगळा सन्मान सोहळा संपन्न.
पिंपरी, दि. 24 (शफिक शेख):- पिंपरी-चिंचवड़ महानगरपालिकेचे एक्झिकिटिव्ह इंजीनियर आदरणीय सतीशजी इंगळे आणि सुविद्य पत्नी यांना असामान्य जन्मलेला विषेश मुलगा असूनही सामान्यांप्रमाणे घडवून समाजात एक सकारात्मक संदेश देत घडवलेल्या रत्नाचा ह्रदयस्पर्शी सन्मान सोहळा शहराध्यक्ष श्री.अजित दामोदर गव्हाणे यांच्या अध्यक्षतेत तसेच माजी नगरसेवक श्री.नारायणजी बहिरवाडे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये स्वामी समर्थ मंदीर, शिवतेजनगर, चिंचवड येथे संपन्न झाला.
गायन क्षेत्रात १४ वर्ष शास्त्रीय संगीत शिकत अतिशय उत्कृष्ठ कामगिरी केलेल्या पृथ्वी(वंडरबॉय)ला सन्मान पत्र देत सन्मानित करण्यात आले. संगीत आणि भक्तिगीत गावून पृथ्वीने सर्वांची मने जिंकत सर्वांच्याच डोळ्यातुन आनंदाश्रु काढले. माननीय शहराध्यक्ष अजित गव्हाणे व अर्बन सेल महिला अध्यक्षा मनिषा गटकळ आणि सहकारी, इतर सर्व मान्यवर यांचे हस्ते पृथ्वीला फेटा बांधून औक्षण तसेच शाल, श्रीफळ, सन्मानपत्र देऊन शेकडो भाविकांमध्ये सन्मानित करण्यात आले. पृथ्वीचे कौतुक करताना शहराध्यक्ष अजित भाऊ गव्हाणे यांनी राष्ट्र्वादी काँग्रेस पार्टी पृथ्वीच्या यशाची दखल घेत त्याला व्यासपीठ तैयार करुन देऊ, त्याच्या सोबत सदैव पाठीशी राहु असा शब्द देत शुभेच्छा दिल्या.
या सन्मान सोहळ्यास शहराध्यक्ष अजितभाऊ गव्हाणे, मा.नगरसेवक नारायणजी बहिरवाडे, अर्बन महिला अध्यक्ष मनिषा गटकळ, युवक अध्यक्ष इम्रान शेख, वर्षा जगताप, माधव पाटील, काशीनाथ जगताप, सुनीलजी कदम, राजारामजी सावंत, अशोकजी मगर, हरिनारायनजी शेळके, कविता खराडे, सारिका पवार, मीराताईं कुदळे, मनिषा जडर, बबिता बनसोड, संगिता गोडसे, राजू गुणवंत तसेच इतर राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्ताविक मनिषा गटकळ यांनी केले तर सूत्रसंचालन राजारामजी सावंत यांनी केले. कार्यक्रमाचे आभार मनिषा जडर यांनी मानले.