आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-स्वातंत्र्यदिनी देश व छत्रपतींच्या अवमान घटनेने काही युवकांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालय समोर केले निदर्शन.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

स्वातंत्र्यदिनी देश व छत्रपतींच्या अवमान घटनेने काही युवकांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालय समोर केले निदर्शन.
सातारा दि: सातारा जिल्ह्यात सर्वत्र १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होत असतानाच सामाजिक तडे निर्माण करण्यासाठी भारत देश व छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारख्या युगपुरुषाचे बदनामी करण्याचा स्टेटस एका युवकांनी ठेवला होता. त्या युवकाविरोधात तसेच त्याला पाठिंबा देणाऱ्या एका कार्यकर्त्याच्या विरोधात हिंदू समाजातील काही युवक आक्रमक झाले होते. त्यांनी सातारा उप जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन सदर युवक व एका सामाजिक कार्यकर्त्याला विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांची सातारा ही राजधानी आहे याच ठिकाणी असा प्रकार घडून येईल त्याबाबत काही राजकीय पक्षाने मौन धारण केल्याने तो एक चर्चेचा विषय ठरलेला आहे
याबाबत सातारा शहरातील अमर लक्ष्मी सातारा येथे राहणारा एका युवकांनी इंस्टाग्राम या सोशल प्लॅटफॉर्मवर छत्रपती शिवाजी महाराज व भारत देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त अवमानकारक मजकूर मराठी भाषेत ठेवला होता. तसेच आय लव पाकिस्तान अशा आशयाची पोस्ट केली होती. त्यामुळे या प्रकरणाला जातीय स्वरूप देऊन काही महाविद्यालयीन युवक यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालय समोर येऊन मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. तसेच या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला. सदर घटनेबाबत तपशील देताना सातारा शहरात व जिल्ह्यात अशा घटना ज्या ज्या वेळी घडल्या त्याचाही तपशील देण्यात आलेला आहे. सदर व्यक्ती विरोधात ए.टी.एस., सी.बी.आय., एन.आय.ए. यांच्याकडून चौकशी करावी. अशीही मागणी करण्यात आलेली आहे. दरम्यान ,या प्रकरणाला राजकीय स्वरूप प्राप्त झाल्यामुळे व आगामी सातारा नगर परिषदेच्या निवडणुकी संदर्भात सदर व्यक्ती विरोधात वातावरण तयार करण्याचा भाग म्हणजे हा प्रकार असल्याची काहींनी दबक्या आवाजात सांगितले आहे. या घटनेचे पडसाद कुठेही उमटू नये व त्याला राजकीय स्वरूप प्राप्त होऊ नये. यासाठी मोठ्या प्रमाणात सातारा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सातारा जिल्ह्यातील निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांना निवेदन देण्यात आले.
—————————————————————
चौकट – सदर घटना घडली त्याचा निषेध करणे गरजेचे व योग्य आहे. पण, त्यामध्ये कोणी ही राजकारण करण्यापेक्षा विकास कामातून विरोधकांना शह दिला पाहिजे. सदर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न ज्यांनी केला असा आरोप आहे. ते साताऱ्यातील राजघराण्याशी निष्ठा असणारे कार्यकर्ते आहेत. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

——————
फोटो – सकल हिंदू समाज, सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली निदर्शने करताना कार्यकर्ते व विद्यार्थी

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button