वाई:-रविवार पेठ वाई येथील प्रमुख मान्यवरांनी शाळा नं 9 ला शालेय उपयोगी साहित्य देऊन राबवीला अभिमानास्पद उपक्रम.
पत्रकार शिरीष जाधव महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष:-9822430730

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार शिरीष जाधव महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष
वाई:-रविवार पेठ वाई येथील प्रमुख मान्यवरांनी शाळा नं 9 ला शालेय उपयोगी साहित्य देऊन राबवीला अभिमानास्पद उपक्रम.
वाई प्रतिनिधी
रविवार पेठ वाई या भागातील सी स नं 1818 या जागेवर आ मकरंद आबा पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे भव्य दिव्य अशी ईमारत उभी राहिली. याच ठिकाणी नगरपरिषद शाळा नं 9 ची शाळा गेल्या काही दिवसांपासून भरत आहे. परंतु शाळेकडे अपुऱ्या सुविधा असल्या मुळे बरेच विद्यार्थी शाळेतुन गैरहजर राहत किंबहुना प्रसंगी शाळेच्या पट संख्येवर परिमाण होत असत ही बाब शाळा नं 9 चे मुख्याध्यापक श्री दुधाने सर यांनी या भागातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. मुख्यता पदाची व प्रसिद्धीची कोणतीही अपेक्षा न ठेवता युवा उद्योजक व मार्गदर्शक श्री भारत दादा चव्हाण, मा नगरसेवक श्री धनंजय बाबा बनकर, रविवारपेठ चे प्रमुख मार्गदर्शक व युवा नेते घनश्याम उर्फ पिंटू चक्के, वाई ग्राम विकास सोसायटी चे संचालक समिरजी मुंगसे, जेष्ठ नेते व वाई ग्राम विकास सोसायटी चे मा संचालक शंकर आबा ढगे, प्रमुख मार्गदर्शक संजय आबा ढगे,युवा नेते, शंभु सुर्यवंशी, मा नगरसेवक राजेश गुरव, युवा नेते श्री शिवाजी ननावरे, युवा नेते श्री अनिकेत वाईकर व युवा नेते ACLS व स्टार न्युज महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष श्री निलेश मोरे व युवा नेते किरण गुजर या सर्व मान्यवरांनी सामुहीक योगदानातुन संपुर्ण साउंड माईक, सतरंजी, बस्करे ,कार्यालय फर्निचर खुर्ची टेबल तसेच ईतर शालेय उपयोगी साहित्य देऊन आपले सामाजिक कर्तव्य पार पाडले या वेळी या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला व भविष्यात कोणतीही गरज असल्यास त्या साठी कटीबद्ध राहण्याचे आश्वासन मान्यवरांनी दिले
या वेळी मुख्याध्यापक श्री दुधाने सर यांनी अशी वैचारिक बैठक असणारे व सामाजिक बांधिलकी जपणारे मान्यवर वैधानिक पदांवरती आल्यास भागाचा विकास होण्यास व प्रशासकीय संतुलन राखण्यास मदत होईल कार्यक्रमास मुख्याध्यापक श्री दुधाने सर खांडके मॅडम व बाचल मॅडम तसेच ओम साई मित्र मंडळातील पदाधिकारी व कार्यकर्ते व रविवार पेठेतील ग्रामस्थ उपस्थित होते.