खंडाळा:-खंडाळा सेतू ऑपरेटर यांच्यावर गुन्हा दाखल करून तत्काळ निलंबित करण्याची माहिती अधिकार कायदा जनजागृती अभियान केंद्र महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांची जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी.
पत्रकार अनिता शिंदे महाराष्ट्र राज्य महिला संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार अनिता शिंदे महाराष्ट्र राज्य महिला संघटक
खंडाळा सेतू ऑपरेटर यांच्यावर गुन्हा दाखल करून तत्काळ निलंबित करण्याची माहिती अधिकार कायदा जनजागृती अभियान केंद्र महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांची जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी.
खंडाळा तालुक्यात चालत आहे दोन ठिकाणी नागरी सुविधा सेतू केंद्र.
मा. तहसीलदार खंडाळा कार्यालयात अनियमित, अनधिकृत, बेकायदेशीर, सेतू संगणक ऑपरेटर यांच्यावर गेले वर्षभरापासून वारंवार तक्रारी झाल्या असून सदर प्रकरणांची तक्रार पुराव्यासह वारंवार मा. तहसीलदार साहेब खंडाळा यांचेकडे केल्या असून आजपर्यंत दोषी सेतू ऑपरेटर यांच्यावर कोणतीही कार्यवाही केलेली नाही.
नागरी सुविधा केंद्र सेतू खंडाळा मध्ये शासकीय शुल्क नियमानुसार जास्त शुल्क आकारता येत नाही म्हणून सदर सेतू ऑपरेटर १. मुकेश सपकाळ २. आदिनाथ देवकाते यांनी सेतू लॉगईन आयडी भाडेतत्वावर सुलतान शेख नावाच्या इसमाला वापरायला दिलेला आहे. सदर सेतू ऑपरेटर मुकेश सपकाळ हा नागरी सुविधा केंद्र सेतू मध्ये जास्त शुल्क घेता येत नाही म्हणून येणाऱ्या नागरिकांना सुलतान शेख नावाच्या इसमाच्या csc केंद्रामध्ये पाठवून देत असून नागरिकांची फसवणूक करून उत्पन्न दाखले २०० ते ३०० रुपये व जातीचे प्रमाणपत्र व नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र शासकीय भरती किंवा मोठमोठ्या शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश प्रक्रिये करिता लागत असल्यास व तत्काळ हवे असल्यास प्रत्येकी २०००/- ते २५००/- शुल्क आकारले जातात. हे शुल्क व दाखले घेण्याकरिता देण्याकरिता मुकेश सपकाळ हा सुविधा केंद्र सेतू मध्ये येणाऱ्या नागरिकांना सुलतान शेख नावाचा खाजगी इसमाकडे पाठवत आहे. गेले वर्षभरापासून सदर दोषी घटकांनी लाखो रुपये सामान्य नागरिकांकडून उकळले आहेत व सध्या हि उकळतच आहेत. अशा प्रकारे लाखो रुपयांचा घोटाळा व उलाढाल करून सदर सेतूची निविदा घेतलेली नामांकित कंपनीची व शासनाची फसवणूक केलेली स्पष्ट दिसून येत आहे. याबाबत सेतू ऑपरेटर मुकेश सपकाळ व आदिनाथ देवकाते यांच्यावर वारंवार तक्रारी पुराव्यासह झाल्या असून मा. तहसिलदार, नायब तहसिलदार व निवासी नायब तहसिलदार यांनी सदर सेतू ऑपरेटर यांना कायम पाठीशी घालून शासनाची व नागरिकांची फसवणूक केली असे दिसून येत आहे.
तसेच सदर सेतू ऑपरेटर मुकेश सपकाळ यांना तहसिलदार यांनी स्वताची DSC भाडेतत्वावर दिलेली आहे. त्यामुळे सदर ऑपरेटर मुकेश सपकाळ हा भेदभाव करून जास्त पैसे देणाऱ्या नागरिकांस दाखले २ ते ३ तासात अप्रुव्हल करून व इतर csc सेंटर, आपले सरकार केंद्र व संग्राम कक्ष व सामान्य नागरिक यांस हेच दाखले कधी पंधरा दिवस तर कधी २ ते ३ महिने उलटूनही व वारंवार विनंत्या करूनही सदर दाखले वर नमूद नागरिकांस दिले जात नाहीत.
तरी संदर्भीय प्रकरणाची जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी तेचच उपविभागीय अधिकारी वाई यांनी स्वतः लक्ष घालून चौकशी करून सेतूऑपरेटर व संबंधितांवर फौजदारी कारवाईचे आदेश करावेत अशी मागणी माहिती अधिकार जनजागृती अभियान केंद्राचे महाराष्ट्र अध्यक्ष सुनीलकुमार बावधनकर यांनी केली आहे .