सातारा:-महात्मा फुलेंनी विश्वबंधुत्वाची शिकवण दिली : डॉ.फरांदे
प्रतिनिधी अजित जगताप सातारा:-9922241299

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
प्रतिनिधी अजित जगताप सातारा
म.फुलेंनी विश्वबंधुत्वाची शिकवण दिली : डॉ.फरांदे
सातारा : म.फुलें यांचा वारसा डॉ.आंबेडकर व छ. शाहु महाराजानी चालविला.बुद्धानंतर महात्मा जोतिबा फुले यांनीच खऱ्या अर्थाने विश्वबंधुत्वाची शिकवण दिली.ती शिकवण आत्मसात करणे हे देशहिताचे आहे असे प्रतिपादन डॉ.प्रमोद फरांदे यांनी केले.
येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर परिसरातील सांस्कृतिक सभागृहात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्यावतीने म. जोतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.तेव्हा “म.जोतिबा फुले आणि सत्याचे समग्र विचार” या विषयावर डॉ.फरांदे मार्गदर्शन करीत होते.अध्यक्षस्थानी अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत होते.
डॉ.प्रमोद फरांदे म्हणाले, म.फुले यांनी पत्रकारीताही समाजप्रबोधनपर होती. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनीही वृत्तपत्रामध्ये सामाजिक प्रश्नांवर वृत्तपत्रामध्ये लेखन केले होते. शिवजयंतीचे खरे श्रेय म.फुलेंनाच जाते.समता, स्वातंत्र्य,बंधुत्व,न्याय यासाठीच त्यांनी जीवन अर्पण केले होते.जातीय व्यवस्थेचा धोका हा मानव जातीच्या उन्नतीमध्ये अडथळा ठरत आहे.त्यामुळे जाती, वर्णभेदाविरोधातील महात्मा फुलेंचा वस्तुनिष्ठ आणि वैज्ञानिक दृष्टीकोन समजून घेणे गरजेचे आहे.
अध्यक्षस्थानावरून बोलताना चंद्रकांत खंडाईत यांनी समितीबाबत भाष्य केले.येणाऱ्या वर्षभरात सर्व समाज घटकांना घेऊन समाजप्रबोधनपर कार्यक्रम हाती घेण्यात येतील.म.फुलेंच्या जीवन कार्यावरही त्यांनी प्रकाशझोत टाकला.
प्रारंभी,डॉ.आंबेडकर पुतळ्यास शोभा भंडारे व कु.मेघा खंडाईत (गुडी) यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तदनंतर सामुदायिक वंदना घेण्यात आली.म.फुले यांच्या प्रतिमेस प्रमोद फरांदे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी समता सैनिकांनी मानवंदना दिली.
*समता सैनिकांना ड्रेस कोड किटचे वाटप:* म.फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे संरक्षण सचिव दिलीप एकनाथ फणसे यांच्याकडून समता सैनिक यांना ड्रेस कोड किटचे वाटप करणयात आले.बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर यांच्या हस्ते व प्रमोद फरांदे यांच्या प्रमुख उपस्थितीत विकास तोडकर,शाहिर यशवंतराव भाले, किशोर गायकवाड,दिलीप सावंत, सौ. कल्पना कांबळे,द्राक्षा खंडकर व शोभा भंडारे आदींना किटचे वाटप करण्यात आले.कार्याध्यक्ष अरुण पोळ, सरचिटणीस संदीप कांबळे, सचिव रमेश इंजे व ऍड.विलास वहागावकर यांनी स्वागत केले. अरुण जावळे व जीवन मोहितें यांनी प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.जीवन मोहितें यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष आबासाहेब दणाने यांनी आभार मानले.सदरच्या कार्यक्रमास संयुक्त जयंती महोत्सव समितीसह तत्सम संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते.
फोटो : म.जोतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना प्रमोद फरांदे व मान्यवर.