क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बिग – ब्रेकिंग:-वाई – बसच्या चाकाखाली येऊन तेरा वर्षीय सुलतानपूरच्या मुलीचा मृत्यू-वाई आगारात खळबळ.

संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

वाई दि.१२ :- वाई येथील बस स्थानकवर आज दुपारी दीडच्या सुमारास एस टी बसच्या चाकाखाली येऊन १३ वर्षीय विद्यार्थीनी चिरडल्याने जागीच ठार झाली असून दुर्दैवी मुलीचे नाव श्रावणी विकास अहिवळे ( रा. सुलतानपूर, ता. वाई, ) असून ती तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी विद्यालयात इयत्ता ७ वी मध्ये शिकत होती. वाई बालेघर गाडी क्र.एम एच १४ बी टी ०४९६ ही बस बसस्थाणकवर प्लॅटफॉर्म ला लागत असताना गाडीमध्ये शिरण्यासाठी विद्यार्त्यांनी एकच गर्दी केली होती.
यावेळी श्रावणी अहिवळे ही विध्यार्थीनी गाडीच्या मागच्या बाजूस पडली. यावेळी गाडी मागे येत असल्याने तिचे डोके गाडीच्या चाकाखाली चिरडले गेले.
यामुळे बसस्थाणकवर खळबळ उडाली ..तसेच बघ्यांची गर्दी जमली होती.या घटनेची माहिती मिळताच परीवीक्षादिन पोलीस सहाय्यक अधीक्षक कमलेश मीना, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, व सहकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून यावेळी झालेली गर्दी पोलिसांनी हटवली. याप्रकरणी पोलिसांनी वाहन चालक जीवन मारुती भोसले राहणार नांदवळ वय 36 याला ताब्यात घेतले असून अधिक तपास करीत आहेत.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button