खटाव:-मोहिते नगर_चोराडे रस्ता नव्हे मृत्यूचा सापळाच.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा जिल्हा विभाग प्रमुख:-9890318605

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा जिल्हा विभाग प्रमुख
मोहिते नगर_चोराडे रस्ता नव्हे मृत्यूचा सापळाच. मायणी प्रतिनिधी_खटाव तालुक्यातील जाणारा ब्रिटिशकालीन मल्हार पेठ पंढरपूर रस्ता मोहिते नगर ते चोराडे हा दहा किलोमीटरचा रस्ता पूर्णपणे उध्वस्त झाला असून साईड पट्ट्याही पूर्णपणे खचल्या आहेत. समोरून वाहन आले तर वाहन खड्ड्यात घालण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे या मार्गावर अनेक अपघात झाले आहेत. मायणी मार्गे पुसेसावळीला जाणे म्हणजे वाहनधारकासाठी एक दिव्यच आहे. या देशात एका मिनिटाला एक किलोमीटर रस्ता होतो तर मग या रस्त्याचे काय? पंढरपूर कडे जाणारा हा रस्ता मायणीपासून पुढे पूर्ण दोन पदरी झाला आहे. परंतु मायणीपासून चोराडे कडे जाणारा रस्ता पूर्णपणे खचला आहे. तरी शासनाने याची गंभीर दखल घेऊन हा रस्ता खटाव तालुक्याच्या हद्दीत पूर्णपणे डांबरीकरण करावा ,अशी वाहनधारकांची मागणी आहे.