खटाव:-वडूज पोलीस ठाण्यात सर्वसामान्य जनते करिता आकर्षक फलक.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
वडूज पोलीस ठाण्यात सर्वसामान्य जनते करिता आकर्षक फलक.
सातारा : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ नुसार लोकसेवाची कालमर्यादित व विहित अधिकारी याबाबत लोकसेवा तपशील लावण्यात आलेले आहेत त्याच्या शेजारीच वडूज पोलीस ठाण्यात सर्वसामान्य जनते करतात फलक लावला आहे. या फलकामुळे जनतेचे चांगले प्रबोधन झालेले आहे .
याबाबत माहिती अशी की, खटाव तालुक्याचे ठिकाण असलेल्या वडूज पोलीस ठाण्यात नवीन पोलीस ठाण्याची निर्मिती दि २५ सप्टेबर २०२१ रोजी झाली होती. त्यावेळेला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार होते. आजही तेच उपमुख्यमंत्री आहेत. परंतु, त्यांनी नवीन बांधकाम केलेल्या ठाण्याच्या पौर्च बाबत सूचना केली होती. या पोलीस ठाण्यातील पोर्चची उंची कमी करा. असे सूचित केले होते.पण आजही ते उंची तशीच आहे. आता त्यात कुठलाही बदल झालेला नाही.
आता प्रोफेशनरी पोलीस उपाधीक्षक अजय कोकाटे यांनी वडूज पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारातच सर्वसामान्य जनते करता फलक लावून प्रबोधन केले आहे.लाच देणे घेणे हा गुन्हा आहे. पोलीस स्टेशन मध्ये कोणतेही कामासाठी पैसे लागत नाहीत. वडूज /मायणी पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी आपल्या पैसे मागत असल्यास खालील फोन नंबर वर संपर्क साधावा. असा अजय कोकाटे प्रो डीवायएसपी मोबाईल नंबर 94 20 83 62 60 असा ठळक अक्षरात फलक लावलेला आहे .
त्याच्या शेजारी तक्रारदार प्रथम खबरी अहवालाची प्रत, नोंदणी , लाऊड स्पीकर परवाना देणे, कार्यक्रम, सभा, संमेलन, मिरवणूक, शुभ कार्य इत्यादी करता परवानगी अशा बारा प्रकरणासाठी किती कालावधी? कोणत्या अधिकाऱ्याकडे हे काम आहे . त्यांची नावे तसेच प्रथम अपील अधिकाऱ्यांची पदनाम, द्वितीय अपील अधिकारी, असा फलक लावण्यात आलेला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने वडू ज पोलीस ठाण्यामध्ये पारदर्शक कार्यक्रमाची पहाट झालेली आहे.
वास्तविक पोलीस ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात तक्रारी व त्याचे निरासन केले जाते. यामध्ये काही वेळेला राजकीय हस्तक्षेप कारणीभूत ठरतो. त्यातून मग पैशाची देवाणघेवाण होते. या गोष्टीचा सर्वातच वीट आलेले आहे. परंतु, सातारा जिल्ह्यातील वडूज पोलीस ठाण्यामध्ये लाच देणे व लाच घेणे हा गुन्हा असल्याचे जाहीरत्या जनतेला सांगून प्रबोधन करणारे प्रोफेशनरी डीवायएसपी अजय कोकाटे यांच्या फलकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतलेले आहेत. त्यामुळे आता लोकांच्या मध्ये चर्चेत असलेले मंथली, हप्ता, चाय पाणी हे सर्व प्रकार बंद होतील असा विश्वास वडूजकरांना वाटत आहे.
————————————————————-
फोटो – वडूज पोलीस ठाण्यातील लक्षवेधी फलक (छाया- अजित जगताप, सातारा)