सातारा:-वाट पाहुनी जीव शिनला, दिसा मागुनी दिस टळला गीताचे सातारकरांना करून दिली आठवण,,,,,,
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
वाट पाहुनी जीव शिनला, दिसा मागुनी दिस टळला गीताचे सातारकरांना करून दिली आठवण,,,,,,
सातारा दि: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व सातारा जिल्ह्यातील सुपुत्र नामदार एकनाथ शिंदे यांचे गुरुवार दि: १० ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचार वाजता अचानक सातारा शहर दौरा निश्चित केला. मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने सातारा सैनिक स्कूल येथे येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासन व पालकमंत्री शंभूराजे देसाई यांना मिळाली. त्यामुळे सर्वजण आतुरतेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय हेलिकॉप्टरची वाट पाहत होते. यावेळी वाट पाहून जीवनाला दिसा मागून दिस टळला,,,, या मराठी गीताची आठवण उपस्थितांना झाली.
याबाबत माहिती अशी की, सातारा शहरातील सैनिक स्कूलच्या मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र शासनाच्या हेलिकॉप्टरने येणारे असल्याची अधिकृत माहिती मिळताच सातारा शासकीय विश्रामगृह मध्ये उपस्थित असलेले सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई , आ.मकरंद पाटील,जिल्हा अधिकारी जितेंद्र डूडी ,जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारे, सातारा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी अभिजीत बापट, माहिती अधिकारी हेमंत चव्हाण, पवार व शिवसेनेचे सातारा शहर प्रमुख निलेश मोरे यांच्यासह पत्रकार मित्र सुद्धा हजर होते. सुमारे शंभर- दीडशे अधिकारी, कार्यकर्ते, पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते. पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
हेलिपॅड नजिक वाट पाहत एकामेकांच्या औपचारिक चर्चेत सर्वजण सामील झाले होते.मात्र ,पालकमंत्र्यांचे सर्व लक्ष आभाळाकडे लागले होते. कधी एकदा हेलिकॉप्टरचा आवाज येतोय. असं त्यांना झाले होते .आणि सुमारे वीस मिनिटांच्या कालावधीनंतर हेलिकॉप्टरचा आवाज आला. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव पसरले. दहा मिनिटात हेलिकॉप्टर सैनिक स्कूलच्या हेलीपॅडवर स्थिरावले. त्यानंतर प्रोटोकॉल नुसार स्वागत समारंभ व सलामी देण्यात आली.
या वेळेला साधी माणसं या चित्रपटातील गीतकार योगेश व आनंदघन यांनी संगीत दिलेले,,,,,, ””””””वाट पाहून जीव शिनला,,,,,,, दिसा मागून दिस टळला ,,,,,,,,,सुर्या आला तळपूनी गेला, मावळतीच्या खळी गालाला गडनी, सखे गडणी ,,,या गीताची मात्र वयस्क अधिकारी व कार्यकर्त्यांना आठवण व्हावी अशा पद्धतीने पालकमंत्री शंभूराज देसाई यांची आकाशाकडे नजर लागल्याची क्षणचित्रे कॅमेर्याने कॅमेरा बंद केली आहेत .
,_____________________________________
फोटो — मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टर कडे लक्ष ठेवून असलेले पालकमंत्री शंभूराजे देसाई
(छाया- अजित जगताप सातारा)