सातारा जिल्ह्यातील टोलनाक्याच्या लुटी बाबत लक्षवेधीकडे दुर्लक्ष नको ?
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
सातारा जिल्ह्यातील टोलनाक्याच्या लुटी बाबत लक्षवेधीकडे दुर्लक्ष नको ?
सातारा दि: महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये सर्वसामान्यांना भेडसावणारे प्रश्न उपस्थित करून त्यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत असते. पण, सातारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील दोन टोल नाक्या बाबत लक्षवेधी सूचना मांडूनही त्याकडे दुर्लक्ष होऊ नये ? अशी मागणी अनेक वाहन चालक व स्थानिक भूमिपुत्रांनी केली आहे.
याबाबत माहिती अशी की, पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गच्या विस्तारीकरणामुळे वीस वर्षापर्वी स्थानिकांच्या पिकावू जमीन संपादित करण्यात आली होती. सुरुवातीच्या काळात स्थानिकांना टोल माफी देण्यात येत होती. त्यानंतर सवलतीच्या दरात वाहन चालकांना मासिक पास देण्यात येत होता. आता मात्र या दोन्ही सवलती बंद करण्यात आल्या आहेत. अशी तक्रार करण्यात येत आहे.
सातारा जिल्ह्यातील स्थानिक बड्या घराण्यातील एका लोकप्रतिनिधींच्या बगलबच्चांना या टोल नाक्यावरील टोल वसुलीचा ठेका सातत्याने देण्यात येत आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील आनेवाडी व कराड तालुक्यातील तासवडे टोलनाके वादग्रस्त बनलेले आहेत. दर महिन्याला या ठिकाणी राडा पाहण्यास मिळतो. त्याचे कारण असे की, लोहा लोहे को काटता है ,,, अशा पद्धतीने जर टोल नाक्यावर एखादा खामक्या वाहन चालक असेल तर मग त्या ठिकाणी राडा ठरलेला असतो. मात्र, काही गरीब व स्थानिक भूमिपुत्र वादावादी व मारहाणीच्या भीतीपोटी सवलती ऐवजी टोल नाक्यावर टोल देऊनच प्रवास करतात. स्थानिकांना ओळखीचे नसलेले टोल नाक्यावर टोल वसुली करतात. स्थानिकांना या ठिकाणी काम दिले जात नाही.
याबाबत काही लोकप्रतिनिधींनी अनेकदा तीव्र आंदोलन केले होते. यामध्ये वाहतूक संघटनेच्याही पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर पुढे काय झाले ? याची सार्वजनिक माहिती कधी पुढे येत नाही. बंद खोलीत चर्चा होते. यंदाच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आदरणीय आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील या सत्ताधारी व विरोधी पक्षातील आमदारांनी सातारा जिल्ह्यातील टोलबाबत विधिमंडळाच्या अधिवेशनात लक्षवेधी मांडली. या लक्षवेधीला नेहमीप्रमाणे याबाबत चौकशी करण्यात येईल .असे निर्देश दिलेले देण्यात आलेले आहेत .विशेष म्हणजे विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये टोल नाक्या वसुली बाबत भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री व आमदार बाळासाहेब पाटील यांनी लक्षवेधी मांडून वाहन चालकांच्या होणाऱ्या त्रासाबद्दल आपले मत मांडले. यापूर्वीही आनेवाडी व तासवडे टोल नाक्या बाबत लोकप्रतिनिधींनी व वाहतूक संघटनेने आंदोलन केले होते . त्याचे पुढे काय झाले? याची सार्वजनिक रित्या कधीही माहिती उघड झालेली नाही.
आता या लक्षवेधी वरती चौकशी केली जाईल. असे निर्देश देण्यात आले. परंतु, ही चौकशी केव्हा होणार ? त्याचा कालावधी कोणता ? टोल नाका वसुली बाबत दोषी आढळल्यास आढळल्यानंतर टोल वसूल करणारा वर कोणती कारवाई होणार ? स्थानिकांनी यापूर्वी भरलेले पैसे परत केव्हा मिळणार ? याचे मात्र स्पष्टीकरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांनी या टोल वसुली बाबत ठोस व कृतीशील कारवाई व्हावी. अशी मागणी केलेली आहे. तसेच आ. भोसले, आ. पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानलेले आहेत .आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत स्थानिक भूमिपुत्रांना टोल माफी देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. हे जाहीरनामा किंवा वचननाम्यामध्ये पहिल्या पाच मध्ये उमेदवारांनी किंवा त्यांच्या राजकीय पक्षांनी उल्लेख करावा. अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे सातारा शहर अध्यक्ष मिलिंद कांबळे,उपाध्यक्ष अमोल गंगावणे , शेतकरी संघटनेचे नेते बाळासाहेब चव्हाण, राजू फडतरे व मान्यवरांनी केलेली आहे.
—————–&—————————————
चौकट – आनेवाडी टोल नाका नजिक रायगाव महामार्ग पूल बांधण्यात आला आहे. त्यामध्ये नेहमीच पाणी साचले जाते. सतत बातम्या दिल्या जातात.पण,ही समस्या दूर होऊ शकली नाही. तसेच रस्त्यावर खड्डे पडले आहेत. याकडे निदान पुढील काळात तरी आवाज उठवावा अशी मागणी रायगाव चे सुपुत्र समाधान गायकवाड, अजित निकम, मनोज पवार व इतर ग्रामस्थांनी केली आहे.
—————————————————
फोटो – सातारा जिल्ह्यातील वादग्रस्त टोल नाका (छाया – अजित जगताप, सातारा)