वाई:-ACLS आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेची सुरूर येथील राजगड हॉटेलवर बैठक संपन्न.
पत्रकार निलेश मोरे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष:-8390501946

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार निलेश मोरे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष
दि:-31/07/2023
ACLS आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेची सुरूर येथील राजगड हॉटेलवर बैठक संपन्न.
प्रतिनिधी: सातारा
ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION /RPS STAR NEWS या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेची बैठक पार पडली. या वेळी बैठकीस राष्ट्रीय संपादक अध्यक्ष मा. श्री.प्रल्हाद चव्हाण साहेब,राष्ट्रीय विधी सल्लागार मा. श्री. प्रशांत खरे साहेब,महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष मा.श्री.निलेश मोरे साहेब,महाराष्ट्र राज्य महिला संघटक मा.सौ.अनिता शिंदे मॅडम,महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष मा.सौ.सुप्रिया पाटसुपे मॅडम, तसेच महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष मा.सौ.कुंदा भोपी मॅडम, मा.श्री.शिरीष जाधव साहेब महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सचिव मा.श्री.विजय काळे साहेब,मराठवाडा संघटक बाळासाहेब सरोदे तसेच छ. संभाजीनगर सातारा जिल्हा अध्यक्ष मा.श्री.विनोद पाटील साहेब, सातारा जिल्हा महिला संघटक मा.सौ. भारती पार्टे, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष मा.श्री.बाळासाहेब इंगवले साहेब, छ.जिल्हा अध्यक्ष मा.श्री.बाबासाहेब सूर्यवंशी साहेब,मा.श्री.विलास कुहीले साहेब तसेच पत्रकार प्रतिनिधी पदाधिकारी व कार्यकारिणीतील सभासद उपस्थित होते.
या वेळी राष्ट्रीय कायदेशीर सल्लागार अॅड प्रशांत खरे यांनी पत्रकारांना येणाऱ्या कायदेशीर अडचणी व संरक्षण या विषयांवर मार्गदर्शन केले कायद्याच्या भुमिकेत राहुन समाजातील उपेक्षित घटकांना न्याय देउन संघटना अधिक सशक्त करता येते असे प्रतिपादन केले.
या वेळी राज्याचे कार्याध्यक्ष निलेश मोरे साहेब यांनी पदाधिकाऱ्यांना येणाऱ्या समस्या व राज्यात काम करत असलेल्या पदाधिकाऱ्यांनी संघटना सशक्त करण्यासाठी राज्यव्यापी धोरण अवलंबण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. यासह आगामी काळात ACLS आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना एक राष्ट्रव्यापी चळवळ म्हणून काम करेल. यासाठी सर्व स्तरातील पदाधिकाऱ्यांनी पुढे येणे गरजेचे आहे.समाजातील न्याय्य हक्कांसाठी संघटना निरंतर कार्य करेल असे मत व्यक्त केले.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण साहेब यांनी संघटनेची धेय्य धोरणे,कामकाजाची पद्धत व पदाधिकाऱ्यांचे नियमन कशा प्रकारे राहील या विषयी मार्गदर्शन केले. पत्रकारीता क्षेत्रामध्ये येणाऱ्या अडचणीविषयी लवकच केंद्रीय संपर्क कार्यालय स्थापन केले जाईल. त्या अनुषंगाने कामकाजामध्ये नियमीतता राहील प्रादेशिक समतोल राखण्यासाठी लवकरच विभागवार समित्या स्थापन करून जबाबदारी चे वाटप केले जाईल. नवी दिल्ली या ठीकाणी संस्थेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची स्थापना करून संघटना स्वयंपूर्ण करण्याविषयी पावले उचलली जातील असे मत व्यक्त केले.
या बरोबरच पत्रकार भवन हा संघटनेचा मानबिंदू असल्याचे प्रतिपादन श्री चव्हाण साहेब यांनी केले.
या वेळी कार्याक्रमाच्या ठीकाणी नवनियुक्त पदाधिकारी यांना जबादारीचे वाटप करण्यात आले.संघटनेसाठी मौलिक कामगिरी करणार्या पदाधिकाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन PRR पुणे जिल्हा महिला वैष्णवी शिंदे यांनी केले. यावेळी छ. संभाजीनगर,मुंबई पुणे, अमरावती,नागपुर, सातारा, कोकण नवी मुंबई वैजापूर ई.विभागातील पदाधिकारी उपस्थित होते.
मौजे पांढरवाडी,काळेवाडी ग्रामस्थांनी मा.श्री.प्रल्हाद चव्हाण साहेब यांनी गौरवास्पद कार्य केल्याबद्दल पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले.