ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वडूज:-अनुकंपा नोकरीसाठी डावलल्याने खटाव तालुक्यातील तरुणाचा आत्मदहन करण्याचा इशारा.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

अनुकंपा तत्वावर सेवा ज्येष्ठता यादीत डावलल्यामुळे तरुणाचा आत्मदहनाचा इशारा.
दि. १५ ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

वडूज दि: मृद व जलसंधारण विभागाचे कर्मचारी हयात नाहीत. त्यांच्या जागी अनुकंपा तत्वावर सेवा जेष्टता यादीत नाव समाविष्ट आहे . परंतु, मराठा समाजातील तरुणाला डावलले असल्याचा आरोप करत सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालय येथे दि. १५ ऑगस्ट रोजी आत्मदहन करण्याचा इशारा बेरोजगार तरुण धनंजय शिवाजी चव्हाण रा.-येरळवाडी ता. खटाव जिल्हा सातारा यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनातील अधिक माहिती अशी की , मृद व जलसंधारण विभाग पुणे यांचेकडील
अनुकंपा तत्वावरील सेवा जेष्टता यादीमध्ये सन २००७ रोजी श्री. चव्हाण यांचा जेष्टता नंबर १४ वा असा होता.सदर विषयाची माहिती त्यांनी माहितीच्या अधिकारामध्येमाहिती मागविली होती. सन २०१० साली त्यांच्या अगोदरचा १३ नंबर ला असणाऱ्या उमेदवाराला नियुक्ती दिल्यानंतर त्यांचा १४ नंबर असताना त्यावेळेस त्यांच्याशी कोणताही पत्र व्यवहार न करता १५ नंबर पासूनचे सर्व नंबर यांना नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत. असे माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीवरुन दिसून आले आहे.
सदर सेवाजेष्टता यादीतील १५ नंबरला नियुक्ती देवून आज रोजी १३ वर्ष झाली तरी त्यांना अद्याप न्याय मिळालेला
नाही. त्यामुळे दि. १५ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सातारा या ठिकाणी आत्मदहन
करीत आहे. त्यांच्या जीवीतास काही कमी जास्त झालेस मृद व जलसंधारण विभाग पुणे व सातारा जिल्हाधिकारी हे जबाबदार असतील असेही त्यांनी म्हटले आहे .या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मृद व जलसंधारण विभाग पुणे,जिल्हा पोलीस प्रमुख सातारा,मृद व जलसंधारण विभाग सातारा,पोलीस निरीक्षक, वडूज पोलीस स्टेशन यांना दिल्या आहेत. दरम्यान, या बाबत मृद्व व जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर प्रकरणाबाबत पाठपुरावा करून श्री धनंजय चव्हाण यांना न्याय देण्यासाठी माननीय प्रधान सचिव व माननीय आयुक्त, मृद व जलसंधारण विभाग औरंगाबाद विभागाकडे पत्रव्यवहार केल्याची माहिती समजते.

————————————–
फोटो — श्री धनंजय चव्हाण

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button