ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

कराड -उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या विकास कामांसाठी 60.76 कोटी रुपयांचा निधी मंजूर….

पत्रकार प्रमोद देवाडिगा:-( महाराष्ट्र राज्य अध्यक्ष ):9623714741

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार प्रमोद देवाडिगा:-( महाराष्ट्र राज्य अध्यक्ष )

कराड -उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या विकास कामांसाठी 60.76 कोटी रुपयांचा निधी मंजूर….

कराड उत्तरचे भाजपा नेते धैर्यशील कदम यांच्या पाठपुराव्याला यश….

पुसेसावळी: -कराड- उत्तर विधानसभा मतदारसंघाकरिता लागणाऱ्या प्रलंबित विकासकामांच्या निधीसाठी कराड-उत्तर भाजपाचे नेते व पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार,सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण,पालकमंत्री शंभूराज देसाई यांचेकडे भाजपा जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने पाठपुरावा केला होता, त्यास यश येऊन कराड-उत्तर मतदार संघातील गावजोड रस्ते,ग्रामीण मार्ग, इतर जिल्हा मार्ग,प्रमुख जिल्हा मार्ग, राज्य मार्ग तसेच इतर सोयी सुविधांसाठी 60.76 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाली आहेत, महायुती सरकार आलेमुळे कराड-उत्तर मध्ये विकास कामांचा झंझावात सुरु झाला आहे, तसेच भविष्यात ही मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकासकामे खेचून आणली जातील असे प्रतिपादन धैर्यशील कदम यांनी केले.

यामध्ये खटाव तालुक्यातील पळशी ते उंचीठाणे रा.मा. ९ रस्ता सुधारणा करणे.३ कोटी, लाडेगाव ते वांझोळी प्र.जिमा. १०२ रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण.२.५ कोटी,वडगाव(ज.स्वा) येथे कुरणवस्ती रस्ता ग्रा.मा.२७९ वर नांदणी नदीवर पूल बांधणे ८.५ कोटी, तर कराड तालुक्यातील धावरवाडी ते पाल ग्रा.मा – 4 रस्ता सुधारणा करणे 25 लक्ष, ग्रा. मा 143 ते अंतवडी पोहच रस्ता ग्रा. मा 69 रस्ता सुधारणा करणे 30 लक्ष, मसूर रेल्वे स्टेशन ते कोणेगाव प्रजिमा ८३ रस्ता सुधारणा करणे 2 कोटी, वसंतगड तळबीड वराडे हनुमानवाडी शिरवडे रा.मा 166 रस्ता सुधारणा करणे 2 कोटी, यशवंतनगर गाडीतळ ते मसूर शिरवडे रस्ता ग्रा.मा 73 सुधारणा करणे 30 लाख, तासवडे ते वराडे रस्ता ग्रा.मा 77 रस्ता सुधारणा करणे 30 लाख, करवडी ते आरफळ कॉलनी ग्रा.मा 116 रस्ता सुधारणा करणे 30 लाख,
तर पाल खंडाईत वस्ती ते अतीत ग्रा. मा 3 रस्ता सुधारणा करणे 30 लाख, चोरजवाडी – मस्करवाडी- ते साखरवाडी ग्रा. मा 8 रस्ता सुधारणा करणे 30 लाख, किवळ ते घोलपवाडी ग्रा.मा 29 रस्ता सुधारणा करणे 30 लाख, पाडळी ते गायकवाडी ग्रा.मा 28 रस्ता सुधारणा करणे 30 लाख, साखरवाडी ते जंगलवाडी प्रजीमा 47 रस्ता सुधारणा करणे 30 लाख, रा. मा 4 ते पेरले प्रजिमा ३९ रस्ता मजबुतीकरण व सुधारणा करणे 2.50 कोटी, मसूर ते शहापूर फाटा ग्रा.मा. १४२ चौपदरीकरण व सुधारणा करणे 2.20 कोटी, रेठरे बु पाचुंद रस्ता सुधारणा करणे 20 लाख, विरवडे ते करवडी रस्ता सुधारणा करणे – 51 लाख, निसरे फाटा ते कळंत्रेवाडी ते उंब्रज – 4 कोटी, सयापुर जोड रस्ता – 25 लाख, ग्रा. मा 4 ते कोट्री ते जुने गावठाण रस्ता सुधारणा करणे – 35 लाख,
कोरेगाव तालुक्यातील इजिमा- ८८ पिंपरी ते सुर्ली रस्ता सुधारणा करणे २० लाख, रा मा १४२ ते बोरबन ग्रा.मा. १३९ रस्ता सुधारणा करणे. २० लाख, तारगाव ते टकले ग्रा.मा १७७ रस्ता सुधारणा करणे. २० लाख, अपशिंगे ते नलवडे वाडी ग्रा.मा. 136 रस्ता सुधारणा करणे ३० लाख, ग्रा.मा १४२ ते टकले जोडरस्ता ग्रा.मा. १६६ रस्ता सुधारणा करणे ४० लाख, बोरगाव ते किरोली ग्रा.मा.१४२ रुंदीकरण व रस्ता सुधारणा करणे ३कोटी, तारगाव पुल ते तारगाव स्टेशन प्रजिमा- 35 रुंदीकरण व सुधारणा करणे २कोटी, नागझरी वाठार ते इंगळेवस्ती प्रजिमा- 35 रस्ता रुंदीकरण व सुधारणा करणे ३कोटी, ग्रा.मा. १४० साप- वेळू- ग्रा.मा -१५४ रस्ता सुधारणा करणे.२०लाख, सातारा तालुक्यातील आंबेवाडी ते देशमुखनगर प्रजिमा ३२ रस्ता रुंदीकरण व सुधारणा करणे.३.५कोटी, जावळवाडी ते नांदगाव कृष्णा नदी पुलाचे प्रजिमा- ३५ रुंदीकरण करणे, ४कोटी. अंगापूर तर्फे तारगाव ते कामेरी रा.मा १४० रस्ता सुधारणा करणे १.५कोटी, आंबेवाडी ते नांदगाव चौक प्रजिमा-३२ रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण करणे ३कोटी, रा.मा-४ तारगाव पुल ते तारगाव स्टेशन मधील रुंदीकरण व सुधारणा करणे २कोटी, रा.मा-४ ते निसराळे रस्ता सुधारणा करणे २.५कोटी, बोरगाव ते वाघवस्ती प्रजिमा- ३२ रस्ता सुधारणा करणे.१.३कोटी, जावळवाडी चौक ते लिंबाची वाडी प्रजिमा- ३५ रस्ता सुधारणा करणे.२.५कोटी. या प्रलंबित विकासकामाबाबत कराड उत्तर भाजपा पदाधिकाऱ्याकडून धैर्यशील कदमांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना निवेदन देण्यात आले होते, ही सर्व कामे त्या त्या विभागातील परिसरातील नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन सार्वजनिक हितासाठी मंजूर केलेली आहेत या माध्यमातून कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील रखडलेल्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याचा प्रयत्न केल्याचे धैर्यशील कदम यांनी सांगितले.
बरेच दिवस रखडलेल्या या प्रलंबित विकास कामांसाठी 60.76 कोटी रुपयांचा भरून निधी उपलब्ध केल्याबद्दल या विभागातील जनता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार,सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई, सातारा जिल्हा भाजपाचे अध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांना धन्यवाद देत आहेत, तरी भाजपाचे नेते धैर्यशील कदम व मनोज घोरपडे यांनी महाराष्ट्र शासनाचे विशेष आभार मानले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button